Banking News : आजपासून 5 दिवसानंतर ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होणार आहे. खरंतर चालू सप्टेंबर महिन्यात बैलपोळा, गणेशोत्सव असे सण साजरा झालेत. आता ऑक्टोबर महिन्यातही अनेक मोठमोठे सण साजरा होणार आहेत. नवरात्र उत्सव, विजयादशमी अर्थातच दसरा तसेच दिवाळीचा सणही येणार आहे. नवरात्री, दसरा अन दिवाळीचा सण ऑक्टोबर महिन्यात येत असल्याने ऑक्टोबर मध्ये बँकांना अनेक दिवस सुट्ट्या राहणार आहेत.
यामुळे जर तुम्हाला पुढील महिन्यात प्रत्यक्षात बँकेत जाऊन काही काम करायचे असेल तर या सुट्ट्यांची नोंद घेऊनच तुम्हाला तुमचे काम करता येणार आहे. आरबीआयने ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यानुसार, ऑक्टोबर 2024 मध्ये तब्बल 15 दिवस बँकांना सुट्टी राहणार आहे.
म्हणजे अर्धा महिना बँका बंद असतील. परंतु या सुट्ट्या राज्यनिहाय बदलत असतात. म्हणजेच सर्वच राज्यांमध्ये पंधरा दिवस बँका बंद राहणार नाहीत. दरम्यान आता आपण आरबीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ऑक्टोबर महिन्यातील बँकेच्या सुट्ट्या
1 ऑक्टोबर – विधानसभा निवडणुकीमुळे जम्मूमध्ये बँका बंद राहणार आहेत.
2 ऑक्टोबर – राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त सालाबादाप्रमाणे याही वर्षी संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असेल.
3 ऑक्टोबर – जयपूरमध्ये नवरात्रीच्या स्थापनेमुळे बँकांना सुट्टी असेल.
6 ऑक्टोबर – रविवारमुळे संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी राहणार आहे.
10 ऑक्टोबर – अगरतला, गुवाहाटी, कोहिमा आणि कोलकाता येथे दुर्गा पूजा, दसरा आणि महासप्तमीमुळे बँका बंद राहतील.
11 ऑक्टोबर – अगरतला, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, इटानगर, कोहिमा, इंफाळ, कोलकाता, पाटणा आणि रांची येथील बँकांमध्ये दसरा, महाअष्टमी, महानवमी, आयुधा पूजा, दुर्गा पूजा आणि दुर्गा अष्टमी मुळे शिलाँगला सुट्टी असेल.
12 ऑक्टोबर – दुसरा शनिवार अन दसरा, विजयादशमी, दुर्गापूजेमुळे देशभरात बँका बंद राहणार आहेत.
13 ऑक्टोबर – रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहणार आहेत.
14 ऑक्टोबर – गंगटोकमध्ये दुर्गा पूजा किंवा दसेनच्या निमित्ताने बँकांना सुट्टी असेल.
16 ऑक्टोबर 2024- लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अगरतला आणि कोलकाता येथे बँका बंद राहतील.
17 ऑक्टोबर 2024- महर्षि वाल्मिकी आणि कांति बिहू निमित्त बेंगळुरू आणि गुवाहाटी येथील बँकांना सुट्टी असेल.
20 ऑक्टोबर 2024- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
26 ऑक्टोबर 2024- चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.
27 ऑक्टोबर 2024- रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
31 ऑक्टोबर 2024- दिवाळीमुळे जवळपास संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असेल.