Banking News : नोव्हेंबर महिना आता अंतिम टप्प्यात आला आहे. आता लवकरच डिसेंबर महिन्याची सुरुवात होईल. दरम्यान, जर तुम्हाला डिसेंबर महिन्यात बँकेतील काही आवश्यक कामे करायची असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
खरंतर आरबीआय ने डिसेंबर महिन्यात बँकांना किती दिवस सुट्ट्या राहतील याची यादी जाहीर केली आहे. यानुसार, पुढील महिन्यात डिसेंबर महिन्यात बँकेच्या शाखा 17 दिवस बंद राहतील.
पण, सुट्टीच्या काळात ग्राहक डिजिटल बँकिंग, UPI, IMPS आणि नेट बँकिंग यांसारख्या पद्धतींनी आर्थिक व्यवहार करू शकतात. मात्र जर तुम्हाला बँकेत जाऊन काही आवश्यक कामे करायची असतील तर या सुट्टीच्या दिवसांमध्ये तुम्हाला बँकिंग कामे करता येणार नाहीत.
मात्र चेक बुक ऑर्डर करणे, बिले भरणे, प्रीपेड फोन रिचार्ज करणे, पैसे ट्रान्सफर करणे, हॉटेल्स आणि प्रवासासाठी तिकिटे बुक करणे, तुमच्या खर्चाचे तपशील पाहणे यांसारखी अनेक कामे ऑनलाईन होऊ शकतात. आता आपण डिसेंबर महिन्यात बँकांना किती दिवस सुट्ट्या राहतील याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
या दिवशी बँकांना सुट्टी राहणार !
3 डिसेंबर (शुक्रवार) रोजी सेंट फ्रान्सिस झेवियरच्या सणानिमित्त गोव्यात बँका बंद राहतील.
मेघालयमध्ये 12 डिसेंबर (मंगळवार) रोजी पा-तोगन नेंगमिंजा संगमा बँकेच्या सुट्टीच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
मेघालयमध्ये 18 डिसेंबर (बुधवार) रोजी यू सोसो थामच्या पुण्यतिथीनिमित्त बँक सुट्टीच्या दिवशी बँका बंद राहतील.
गोव्यातील बँका 19 डिसेंबर (गुरुवार) रोजी गोवा मुक्ती दिनानिमित्त बंद राहतील.
मिझोराम, नागालँड आणि मेघालयमध्ये 24 डिसेंबर (गुरुवार) रोजी बँक सुट्टीच्या निमित्ताने ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला बँका बंद राहतील.
ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्त 25 डिसेंबर (बुधवार) भारतभर बँका बंद राहतील.
26 डिसेंबर (गुरुवार) रोजी नाताळ सणानिमित्त बँकेला सुट्टी आहे
27 डिसेंबर (शुक्रवार) अनेक ठिकाणी ख्रिसमसच्या उत्सवासाठी सुट्टी राहणार आहे.
मेघालयमध्ये 30 डिसेंबर (सोमवार) रोजी बँक सुट्टी U Kiang Nangbah निमित्त बँका बंद राहतील.
मिझोराम आणि सिक्कीममध्ये 31 डिसेंबर (मंगळवार) रोजी बँक हॉलिडे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला/लोसॉन्ग/नामसुंगच्या कारणास्तव बँका बंद राहतील.
1,8, 15, 22, 29 डिसेंबर (रविवार) असून साप्ताहिक सुटी असल्याने संपूर्ण देशातील बँका बंद राहणार आहेत.
14 आणि 18 डिसेंबरला दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने देशभरातील सर्व बँकांना सुट्टी राहणार आहे.