बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! 9 मे 2025 पासून पुढील 10 दिवस बँका बंद राहणार, कारण काय ? पहा…

मे महिन्याचा पहिला आठवडा संपलाय, आणि अशा परिस्थितीत जर तुम्हाला येत्या काही दिवसांनी बँकेशी निगडित कामे करायची असतील तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण सहा मे 2025 पासून ते 31 मे 2025 पर्यंत बँका किती दिवस बंद राहणार ? याबाबत आरबीआयने आपल्या वेबसाईटवर नेमके काय म्हटले आहे ? याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

Banking News : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत, तसेच लग्नसराईचा आणि सणासुदीचा हंगाम सुद्धा सुरू आहे. यामुळे काही जण बाहेर पिकनिक साठी जात आहेत तर काहीजण शॉपिंग साठी देखील बाहेर पडत आहेत. तर काहीजण आर्थिक नियोजनात गुंतलेले असल्याचे पाहायला मिळते.

दरम्यान जर तुम्हाला या चालू महिन्यात म्हणजेच मे 2025 मध्ये काही बँकेशी निगडित कामे करायची असतील, तुम्हाला यासाठी बँकेत जायचे असेल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे.

खरे तर मे महिन्यात नऊ तारखेपासून पुढील दहा दिवस देशातील बँकांना सुट्टी राहणार आहे. आरबीआय ने याबाबतची माहिती आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेली आहे.

आरबीआय ने दिलेल्या माहितीनुसार मे 2025 मध्ये देशातील बँकांना एकूण 12 दिवसांसाठी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत आता आपण 6 मे 2025 पासून 31 मे 2025 पर्यंत देशातील बँकांना किती दिवस सुट्ट्या राहणार ? याची माहिती जाणून घेणार आहोत.

9 मे पासून पुढील चार दिवस बँकांना सलग सुट्टी 

9 मे 2025 : या दिवशी रवींद्रनाथ टागोर जयंती आहे अन म्हणूनच पश्चिम बंगाल , दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये बँकांना सुट्टी राहणार आहे

10 मे 2025 : देशातील बँकांना प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सुट्टी असते, दहा मे 2025 रोजी मे महिन्याचा दुसरा शनिवार आहे आणि यामुळे या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.

11 मे 2025 : या दिवशी रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.

12 मे 2025 : बुद्ध पौर्णिमा असल्याने या दिवशी देशातील विविध राज्यांमधील बँकांना सुट्टी राहणार आहे. देशातील गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, मिझोराम, मणिपूर, उत्तराखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, सिक्कीम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश व तमिळनाडूमध्ये बँका बंद राहणार आहेत. या दिवशी आपल्या राज्यातील बँकांनाही सुट्टी राहणार आहे.

मे च्या दुसऱ्या पंधरवड्यात बँका किती दिवस बंद राहणार? 

16 मे 2025 : या दिवशी सिक्कीम राज्य  दिन साजरा होतो आणि म्हणूनच सिक्कीम मधील बँका या दिवशी बंद राहणार आहेत.

18 मे 2025 : रविवार असल्याने या दिवशी देशातील बँकांना सुट्टी राहणार आहे.

24 मे 2025 : या दिवशी चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी राहील.

25 मे 2025 : या दिवशी रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.

26 मे 2025 : काझी नजरूल इस्लाम जयंती निमित्ताने त्रिपुरा राज्यातील बँकांना सुट्टी राहणार असल्याची माहिती आरबीआयच्या वेबसाईटवरून मिळाली आहे. 

29 मे 2025 : या दिवशी वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती दिनानिमित्ताने हरियाणा , राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमधील बँकांना सुट्टी राहणार आहे

30 मे 2025 : श्री गुरु अर्जुन देव यांचा शहीद दिवस असल्याने या दिवशी देशातील काही राज्यांमधील बँकांना सुट्टी राहणार अशी माहिती आरबीआयकडून हाती आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe