RBI ची देशातील ‘या’ बड्या बँकेवर मोठी कारवाई ! ग्राहक चिंतेत; बँकेत तुमचे तर खाते नाही ना ? कारवाईचा ग्राहकांवर काय परिणाम ?

आरबीआयने गेल्या काही महिन्यात अनेक बड्या बँकांचे लायसन्स रद्द केले असल्याने बँकिंग सेक्टर मध्ये खळबळ माजलीये. अशातच, आरबीआयने देशातील आणखी एका बड्या बँकेवर कारवाई केली असल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच आरबीआयने साउथ इंडियन बँकेला लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Published on -

Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक बँकांवर कारवाई केली आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे आरबीआयकडून देशातील अनेक बड्या बँकांवर, सहकारी बँकांवर, NBFC वर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एवढेच नाही तर काही बँकांचे लायसन्स रद्द करण्याचा मोठा निर्णय देखील आरबीआयने घेतलेला आहे.

आरबीआयने गेल्या काही महिन्यात अनेक बड्या बँकांचे लायसन्स रद्द केले असल्याने बँकिंग सेक्टर मध्ये खळबळ माजलीये. अशातच, आरबीआयने देशातील आणखी एका बड्या बँकेवर कारवाई केली असल्याची बातमी समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच आरबीआयने साउथ इंडियन बँकेला लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकांमधील ठेवींवरील व्याजदर आणि ग्राहक सेवांबाबत काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल सदर बँकेला 59.20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

31 मार्च 2023 पर्यंत बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत, RBI कडून लेखापरीक्षण मूल्याची चाचणी घेण्यात आली होती. यानंतर आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे आणि संबंधित पत्रव्यवहाराच्या आधारावर या बँकेला नोटीस बजावण्यात आली होती.

दरम्यान, नोटिशीला बँकेने दिलेला प्रतिसाद आणि वैयक्तिक सुनावणी दरम्यान केलेल्या तोंडी सादरीकरणाचा विचार केल्यानंतर मग आरबीआयला असे आढळले की, बँकेवर केलेले आरोप खरे आहेत आणि आर्थिक दंड आकारला जाऊ शकतो.

बँकेने काही ग्राहकांना एसएमएस किंवा ई-मेल किंवा पत्राद्वारे माहिती न देता किमान शिल्लक/सरासरी किमान शिल्लक रक्कम न ठेवल्याबद्दल दंड आणि शुल्क आकारले आहे. आरबीआयच्या नियमानुसार देशातील कोणतीच बँक असे करू शकत नाही.

पण या नियमांची तमा न बाळगता साउथ इंडियन बँकेने ग्राहकांकडून पैसे वसूल केलेत. दरम्यान आता याच विरोधात आरबीआयने बँकेवर ही कारवाई केली आहे.

मात्र आरबीआय ने केलेल्या या कारवाईचा ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही, त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही चिंता करू नये, हे पैसे बँकेकडून वसूल केले जाणार आहेत, पैसे ग्राहकांकडून वसूल होणार नाहीत असे जाणकारांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe