डिसेंबर महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार ? RBI ने जारी केली सुट्ट्याची यादी

Published on -

Banking News : नोव्हेंबर महिना आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या पाच-सहा दिवसात नव्या डिसेंबर महिन्याची सुरुवात होणार आहे आणि या वर्षाचा हा शेवटचा महिना राहील. दरम्यान जर तुम्हाला डिसेंबर महिन्यात काही बँकिंग कामे करायची असतील तर आजची बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे.

खरंतर आरबीआय आपल्या अधिकृत संकेतस्थळावर महिना निहाय बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते. डिसेंबर महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी सुद्धा आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे.

या यादीनुसार या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात देशभरातील बँका विविध सण आणि साप्ताहिक सुट्टीच्या निमित्ताने जवळपास 18 दिवस बंद राहणार आहे. मात्र या सुट्ट्या राज्यनिहाय बदलणार आहेत.

यामुळे जर तुम्हाला बँकेत जाऊन रोख रक्कम जमा करायची असेल, पासबुक प्रिंट करायच असेल, चेक द्वारे मोठी रक्कम काढायची असेल किंवा काही इतर महत्त्वाची बँकिंग कामे करायची असतील तर तुम्ही आजची बातमी शेवटपर्यंत वाचणे आवश्यक राहणार आहे.

कारण की पुढील महिन्यात कोणत्याही बँकिंग कामासाठी तुम्हाला बँकेत जायचे असेल तर ही यादी पाहूनच तुम्हाला तुमच्या कामाचे नियोजन करावे लागणार आहे. 

डिसेंबर महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी

1 डिसेंबर : या दिवशी इंडिजिनस फेथ डे निमित्ताने अरुणाचल प्रदेश मधील बँकांना सुट्टी राहणार आहे.

3 डिसेंबर : सेंट फ्रान्सिस झेवियर्स डे निमित्ताने गोव्यातील बँकांना या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

7 डिसेंबर : रविवार म्हणून या दिवशी बँका बंद राहतील.

12 डिसेंबर : पा तोगन नेंगमिंजा संगमा दिनानिमित्ताने या दिवशी मेघालयातील बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

13 डिसेंबर : दुसरा शनिवार असल्याने या दिवशी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

14 डिसेंबर : रविवार असल्याने या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.

18 डिसेंबर : या दिवशी गुरु घासीदास जयंतीनिमित्त आणि मेघालयात यू सोसो थाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त बँका बंद राहणार आहेत. 

19 डिसेंबर : गोवा मुक्ती दिनानिमित्त या दिवशी गोव्यातील सर्व सरकारी आणि खाजगी बँका बंद राहतील.

21 डिसेंबर : रविवार असल्याने या दिवशी सुट्टी राहणार आहे.

24 डिसेंबर : नाताळ निमित्ताने एक दिवस आधीच मेघालय आणि मिझोरममध्ये बँका बंद राहणार आहेत.

25 डिसेंबर : नाताळ निमित्ताने देशातील बहुतेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

26 डिसेंबर : नाताळाच्या उत्सवामुळे मेघालय, मिझोरम आणि तेलंगणामध्ये बँका बंद राहणार अशी माहिती आरबीआयने दिली आहे.

27 डिसेंबर : गुरु गोविंद सिंह जयंतीनिमित्त हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहणार आहेत. या दिवशी हरियाणात शहीद उधमसिंह यांची जयंती सुद्धा साजरी होते. तसेच चौथा शनिवार म्हणून या दिवशी संपूर्ण देशातील बँका बंद राहणार आहेत.

28 डिसेंबर : या दिवशी रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.

30 डिसेंबर : यू क्यांग नांगबाह दिनानिमित्त आणि सिक्कीममध्ये तमु लोसारनिमित्त बँका बंद राहणार आहेत.

31 डिसेंबर : नूतन वर्षाभिनंदन निमित्ताने या दिवशी  मिझोरम आणि मणिपूरमध्ये खाजगी आणि सरकारी बँकांना सुट्टी राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe