Banking News : तुम्हालाही उद्या आणि परवा बँकेत जाऊन काही महत्त्वाची कामे करायची आहेत का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. बकरी ईदला सहा जून रोजी की 7 जून रोजी कधी बँका बंद राहणार? याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, ईद अल-अधा, ज्याला बकरी ईद किंवा ईद-उल-जुहा असेही म्हणतात, हा इस्लाम धर्मातील दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा सण आहे.

यामुळे या दिवशी देशातील अनेक राज्यांमध्ये सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर केलेली असते तर देशातील अनेक भागांमध्ये बँकांना सुद्धा सुट्टी असते. खरंतर यावर्षी हा सण 7 जून 2025 रोजी साजरा होईल अशी माहिती देण्यात आली आहे.
पण हा सण चंद्रदर्शनावर आधारित असल्यामुळे अंतिम तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. यामुळे बकरी ईद सणानिमित्ताने बँका सहा जूनला बंद राहणार की सात जूनला हा मोठा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. दरम्यान याच संदर्भातील डिटेल माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.
बँका कधी बंद राहणार?
बकरी ईद हा सण फारच मोठा आहे आणि या दिवशी देशभरातील अनेक शासकीय कार्यालये, शाळा आणि बँका बंद राहतील. पण, बकरी ईदनिमित्त बँकांच्या सुट्यांमध्ये राज्यनिहाय फरक दिसून येतो.
म्हणजेच संपूर्ण देशभर एकाच दिवशी बँका बंद नसतात ही गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्यायला हवी. यानुसार, 6 जून 2025 रोजी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर तिरुअनंतपुरम आणि कोची येथील बँका बंद राहतील.
तर 7 जून 2025 रोजी देशातील बहुतांश भागांतील बँका बंद असतील. पण, यादिवशी अहमदाबाद, गंगटोक, इटानगर, कोची आणि तिरुअनंतपुरम येथील बँका पहिला शनिवार असल्यामुळे सुरू राहतील अशी माहिती आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झाली आहे.
शेअर बाजार बंद राहणार की सुरू राहणार?
शेअर मार्केट मधील गुंतवणूकदार देखील बकरीच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहणार का हा सवाल उपस्थित करतायेत. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की बकरी ईद असली तरी शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी खुला राहणार आहे.
NSE आणि BSE या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांनी स्पष्ट केले आहे की, 6 आणि 7 जून 2025 रोजी कोणतीही सुट्टी नसेल. त्यामुळे या कालावधीत शेअर मार्केट मधील गुंतवणूकदार नियमित व्यवहार करू शकतील.