Banking News : जुलै महिना अंतिम टप्प्यात पोहोचला आहे, येत्या पाच दिवसांनी जुलै महिन्याची सांगता होईल आणि ऑगस्ट महिना सुरू होईल. दरम्यान जर तुम्हाला येत्या ऑगस्ट महिन्यात बँकेत जाऊन बँकेची संबंधित काही आर्थिक कामे पूर्ण करायची असतील तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे.
कारण की ऑगस्ट महिन्यात बँकांना जवळपास 14 दिवसांसाठी सुट्टी राहणार आहे. देशातील सर्वच बँकांना 14 दिवसांसाठी सुट्टी राहणार नाही तर राज्यानुसार सुट्टीच्या दिवसांमध्ये बदल राहणार आहे.

आरबीआयने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली असून या यादीनुसार कोणत्या राज्यातील बँका कोणत्या दिवशी बंद राहणार याचीच माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
तथापि जर तुम्हाला ऑगस्ट महिन्यात बँकेशी निगडित महत्वाची कामे करायची असतील तर तुम्ही आरबीआयकडून जारी करण्यात आलेली ऑगस्ट महिन्यातील ही सुट्ट्यांची यादी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
ऑगस्ट महिन्यात या तारखांना बँकेला राहणार सुट्टी
3 ऑगस्ट 2025 : रविवार असल्याने या दिवशी देशभरातील सर्वच बँकांना साप्ताहिक सुट्टी राहणार आहे.
8 ऑगस्ट 2025 : या दिवशी सिक्कीम आणि ओडिषा मध्ये बँकांना सुट्टी राहणार आहे. तेंदोंग लो रम फाटमुळे या दिवशी या दोन राज्यांमध्ये बँकांना सुट्टी राहणार अशी माहिती आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झाली आहे.
9 ऑगस्ट 2025 : रक्षाबंधन सणाचा पार्श्वभूमीवर या दिवशी देशभरातील अनेक राज्यांमधील बँकांना सुट्टी राहणार आहे. आरबीआय ने सांगितल्याप्रमाणे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये या दिवशी सुट्टी राहील.
10 ऑगस्ट 2025 : बँकांच्या नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. 10 ऑगस्ट रोजी ऑगस्ट महिन्याचा दुसरा शनिवार राहणार आहे आणि यामुळे या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
13 ऑगस्ट 2025 : या दिवशी मणिपूर मधील बँका बंद राहतील. मणिपूरमध्ये दरवर्षी या दिवशी देशभक्ती दिन साजरा केला जातो आणि म्हणून या दिवशी मणिपूर मधील बँका बंद राहतील.
15 ऑगस्ट 2025 : स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण असल्याने या दिवशी संपूर्ण देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
16 ऑगस्ट 2025 : आपल्या महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये या दिवशी बँका बंद राहणार आहेत कारण म्हणजे जन्माष्टमी आणि पारशी नववर्ष.
17 ऑगस्ट 2025 : रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने या दिवशी देशभरातील बँका बंद राहतील.
23 ऑगस्ट 2025 : या दिवशी चौथा शनिवार येतो आणि म्हणूनच बँकेच्या नियमानुसार देशभरातील बँकांना सुट्टी राहील.
24 ऑगस्ट 2025 : रविवार असल्याने देशातील सर्वच बँकांना सुट्टी राहील.
26 ऑगस्ट 2025 : या दिवशी कर्नाटक आणि केरळ मध्ये बँकांना सुट्टी राहणार आहे कारण म्हणजे गणेश चतुर्थी.
27 ऑगस्ट 2025 : गणेश चतुर्थी निमित्ताने या दिवशी महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी राहणार आहे.
28 ऑगस्ट 2025 : नुआखाईनिमित्त या दिवशी पंजाब सिक्कीम आणि ओडिशा या राज्यांमधील बँकांना सुट्टी राहणार अशी माहिती आरबीआयने दिली आहे.
31 ऑगस्ट 2025 : रविवार असल्याने या दिवशी देशभरातील बँकांना साप्ताहिक सुट्टी राहणार आहे.