आरबीआयची आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस, आयडीबीआय, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यावर दंडात्मक कारवाई !

RBI ने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय. आरबीआयच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्रवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पण या कारवाईनंतर बँक ऑफ महाराष्ट्र च्या ग्राहकांवर नेमका काय परिणाम होणार ? याचाच आढावा आता आपण घेणार आहोत. 

Updated on -

Banking News : बँक ऑफ महाराष्ट्रसहित आयसीआयसीआय, अ‍ॅक्सिस, आयडीबीआय, बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी एक मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर, RBI ने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय ज्याअंतर्गत देशातील या पाच महत्त्वाच्या बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच आरबीआयकडून गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक सहकारी सहकारी आणि खाजगी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही बँकांचे लायसन्स रद्द करण्याचा सुद्धा निर्णय आरबीआय कडून घेण्यात आलाय.

आरबीआय देशातील सर्व सहकारी, सरकारी आणि खाजगी बँकांवर नजर ठेवून असते. देशातील सर्वच बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते. जर देशातील बँकांनी आरबीआयच्या नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई होते.

अशातच, आता आरबीआयने देशातील पाच महत्त्वाच्या बँकांवर कारवाई केली असून यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचा सुद्धा समावेश होतो. आरबीआयने बँक ऑफ महाराष्ट्र सहित 5 महत्त्वाच्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या संबंधित बँकांवर नियमभंग केल्यामुळे कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. आता आपण RBI ने देशातील या पाच महत्त्वाच्या बँकांवर दंडात्मक कारवाई का केली ? याबाबतचा आढावा घेणार आहोत. तसेच याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार याचाही आढावा घेणार आहोत.

या बँकांवर आरबीआयची दंडात्मक कारवाई 

मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयने आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे. आरबीआय ने याबाबतचे एक परिपत्रक जारी केले असून या परिपत्रकात आयसीआयसीआय बँकेवर 97.20 लाखांचा दंड ठोठावण्यात आला असल्याचे म्हटले आहे.

या बँकेने सायबर सुरक्षा, केवायसी आणि कार्ड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तिच्यावर दंडात्मक कारवाई झाली आहे. अ‍ॅक्सिस बँकेला 29.60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, सदर बँकेने ऑफिस खात्यांच्या अनधिकृत कामकाज केल्याचे आढळल्याने या बँकेवर ही कारवाई झाली.

आयडीबीआय बँकेवर 31.80 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, या बँकेने किसान क्रेडिट कार्ड अनुदानाशी संबंधित निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदाने ग्राहक सेवा आणि वित्तीय सेवा काउंटरवरील निर्देश पाळलेले नाहीत आणि यामुळे या बँकेवर सुद्धा दंडात्मक कारवाई झाली. या सार्वजनिक बँकेवर 61.40 लाखांचा दंड आकारला जाणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रला किती दंड? 

बँक ऑफ महाराष्ट्रावर 31.80 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. केवायसीशी संबंधित सूचनांचे बँक ऑफ महाराष्ट्र कडून उल्लंघन झाले होते अन म्हणून बँकेवर दंड ठोठावण्यात आला आहे. 

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

आरबीआयच्या या कारवाईमुळे ग्राहकांवर कोणताच परिणाम होणार नाही. आरबीआयची ही कारवाई बँकांनी नियमांचे पालन न केल्याबद्दल करण्यात आली आहे. यामुळे आरबीआयने लादलेला हा दंड बँकेकडून वसूल केला जाणार असून ग्राहकांकडून वसूल होणार नाही. म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्रसहित इतर बँकांवर झालेली ही दंडात्मक कारवाई नियमभंग म्हणून झालेली आहे याचा बँक आणि ग्राहकांच्या व्यवहारावर कोणताच परिणाम होणार नाही. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe