RBI चा मोठा निर्णय ! नियम मोडणाऱ्या ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

रिझर्व बँक ऑफ इंडियाने सिटी बँकेवर दंडात्मक कारवाई केली आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न झाल्याने ही कारवाई करण्यात आली असून या बँकेला चक्क 39 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 21 फेब्रुवारी 2025 रोजी आरबीआय आणि याबाबतचे परिपत्रक निर्गमित केले असून या कारवाईमुळे सध्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Tejas B Shelar
Published:

Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेत देशातील एका बड्या बँकेवर कठोर कारवाई केली आहे. यामुळे सध्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण असून आरबीआयच्या या कारवाईमुळे ठेवीदारांच्या पैशांवर काही परिणाम होणार का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. खरंतर आरबीआयने गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक बँकांवर कारवाई केली आहे.

नियम मोडणाऱ्या बँकांवर आरबीआयची करडी नजर असते आणि ज्या बँका नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर आरबीआयकडून कठोर कारवाई केली जात असते. आतापर्यंत आरबीआयने नियमांचे पालन न केल्यामुळे अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे तर काही बँकांचे लायसन्स सुद्धा रद्द करण्याचा निर्णय आरबीआयकडून घेण्यात आला आहे.

अशातच आता आरबीआयने सिटी बँकेवर कारवाई केली आहे. या बँकेवर आरबीआयकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली असून यामुळे सदर बँकेच्या ग्राहकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. देशातील मध्यवर्ती बँकेने म्हणजेच रिझर्व्ह बँकेने सिटी बँकेवर मोठी कारवाई केली आहे.

मध्यवर्ती बँकेने शुक्रवारी 21 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या एका परिपत्रकात असे सांगितले की, मोठ्या कर्जाशी संबंधित सूचनांचे पालन न केल्यामुळे आणि क्रेडिट सूचना कंपन्यांना संबंधित माहिती प्रदान करण्यात विलंब केल्याबद्दल सिटी बँकेवर आरबीआयने दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बँकेवर आरबीआयकडून तब्बल 39 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मध्यवर्ती बँकेने पुढे असे म्हटले की 31 मार्च 2023 रोजी बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात पर्यवेक्षी मूल्यांकन करण्यासाठी वैधानिक तपासणी करण्यात आली होती.

यात मध्यवर्ती बँकेच्या सूचनांचे पालन न केल्याचे उघडकीस आले, दरम्यान या पर्यवेक्षी निष्कर्षांच्या आधारे बँकेला नोटीस बजावण्यात आली होती. सदर बँकेला रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर दंड का लावला जाऊ नये याची कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश दिलेत.

आता देण्यात आलेल्या नोटिशीला बँकेचा प्रतिसाद आणि वैयक्तिक सुनावणी दरम्यान केलेल्या तोंडी सबमिशनचा विचार केल्यावर, रिझर्व्ह बँकेने असे निरीक्षण नोंदवले आहे की बँकेने मोठ्या कर्जाशी संबंधित निर्देशांचे उल्लंघन केल्याची प्रकरणे उशिरा नोंदवली आणि क्रेडिट सूचना कंपन्यांकडून नकार अहवाल मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत काही विभागांशी संबंधित सुधारित डेटा सुद्धा अपलोड केला नाही.

यामुळे अखेरकार आरबीआयने सिटी बँकेवर दंडात्मक कारवाई केली असून या बँकेला आता 39 लाख रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे. मात्र या दंडात्मक कारवाईचा सदर बँकेच्या ग्राहकांवर कोणताच परिणाम होणार नाही. दंडाची रक्कम ही फक्त बँकेला द्यायची आहे, ग्राहकांकडून ही रक्कम वसूल होणार नाही यामुळे या बँकेच्या ठेवीदारांनी कोणतीही चिंता करू नये असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe