Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडिया ही देशातील मध्यवर्ती बँक, या मध्यवर्ती बँकेकडून गेल्या काही महिन्यांच्या काळात अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही बँकांचे लायसन्स देखील आरबीआयने रद्द केले आहे. तर काही बँकांवर आरबीआयकडून कठोर निर्बंध लादले गेले आहेत. अशातच आता आरबीआयने महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लावले आहेत.
या सहकारी बँकेवर कठोर निर्बंध
आरबीआयने महाराष्ट्रातील भवानी सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लावलेले आहेत. या निर्बंधांमुळे आता या बँकेच्या खातेधारकांना खात्यातील रक्कम काढता येणार नाही. हे निर्बंध 4 जुलै 2025 पासून लागू झाले आहेत आणि पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध तसेच कायम राहणार आहेत.

हे निर्बंध लागू करतानाच आरबीआयने या बँकेचा परवाना अजून रद्द झालेला नाही असे देखील स्पष्ट केलेले आहे. तसेच जर बँकेची आर्थिक स्थिती आगामी काळात सुधारली तर हे निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात असेही आरबीआयने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
भवानी सहकारी बँकेची आर्थिक स्थिती बिकट बनली होती. ही बँक आर्थिक अडचणींचा सामना करत होती आणि याच अनुषंगाने आरबीआय कडून या बँकेवर कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आरबीआय कडून घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी चार जुलैपासून होणार आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत. यामुळे सदरील बँकेच्या ठेवीदारांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान आरबीआयकडून बँकिंग रेगुलेशन कायद्याच्या अन्वये हा निर्णय घेण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आरबीआयच्या निर्देशांचे पालन झाले नाही
आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या काही काळापासून भवानी सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीत सातत्याने घसरण होत होती. दरम्यान ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आरबीआयने बँकेच्या संचालक मंडळासोबत तसेच व्यवस्थापनाशी बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी चर्चा केली होती.
पण, भवानी सहकारी बँक आरबीआयच्या निर्देशांचे पालन करण्यात अपयशी ठरली आहे आणि म्हणूनच आरबीआय कडून आता ग्राहकांचे हित लक्षात घेऊन हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.
ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने आरबीआय ने या बँकेवर कडक कारवाई केली आहे आणि या कारवाईमुळे आता या बँकेच्या ग्राहकांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीयेत. मध्यवर्ती बँकेने भवानी सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लावलेले आहेत, पण याचा अर्थ असा नाही की या बँकेचा परवाना रद्द झाला आहे.
या बँकेचा बँकिंग परवाना अजूनही कायम आहे. दरम्यान, बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्यास आरबीआय हे निर्बंध शिथिल करण्याचा किंवा रद्द करण्याचा विचार करू शकते अशी माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे.