RBI चा महाराष्ट्रातील ‘या’ बड्या बँकेला दणका ! ग्राहकांना आता पैसे सुद्धा काढता येणार नाहीत, यात तुमच तर अकॉउंट नाही ना?

Banking News : RBI अर्थातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील एका बड्या बँकेवर मोठी कारवाई केली आहे. खरेतर, गेल्या काही महिन्यात आरबीआयने अनेक बँकावर कारवाई केलीये. यातील काही बँकावर दंडात्मक कारवाई केली अन काही बँकेचे लायसन्स सुद्धा रद्द केले आहे. अशातच आता RBI ने राज्यातील मुंबई स्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर मोठी कारवाई केली आहे.

या कारवाईनुसार, बँकेच्या ग्राहकांना बचत, चालू खात्यातून किंवा कोणत्याही प्रकारच्या ठेवीतून पैसे काढता येणार नाहीत. तसेच, बँकेला नवीन कर्जेही देण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे बँक ग्राहकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. 

बँकेत 2,436 कोटींच्या ठेवी

इकोनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, या बँकेत मार्च 2024 अखेरपर्यंत 2,436 कोटी रुपये जमा होते. आरबीआयच्या नियमानुसार, जमाकर्त्यांना 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षणाचा लाभ मिळेल आणि त्यांनी आपले दावे बँकेत जमा करावेत, असे सांगण्यात आले आहे.

आरबीआयने का घेतला हा निर्णय?

बँकेच्या सध्याच्या आर्थिक स्थिती आणि द्रवता (liquidity) संबंधित चिंतेमुळे RBI ने हा कठोर निर्णय घेतला आहे. जमाकर्त्यांचे हित सुरक्षित राहावे म्हणून बँकेच्या ठेवीवरील निर्बंध लावण्यात आले आहेत.

आरबीआयचा पुढील निर्णय कधी?

हे निर्बंध 13 फेब्रुवारी 2025 पासून लागू होऊन पुढील सहा महिने राहणार आहेत. आरबीआय सतत बँकेच्या परिस्थितीवर लक्ष ठेवणार आणि गरज पडल्यास निर्बंधांमध्ये बदल केला जाईल.

कोटक महिंद्रा बँकेवरील निर्बंध हटवले

दुसरीकडे, आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेवरील 9 महिन्यांपासून लागू असलेले निर्बंध हटवले आहेत. या निर्णयामुळे आता बँक ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंगद्वारे नव्या ग्राहकांना जोडू शकते तसेच नवीन क्रेडिट कार्डही जारी करू शकते. एप्रिल 2024 मध्ये लागू केलेले निर्बंध आता पूर्णपणे हटवण्यात आले आहेत.