Banking News : स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक. ही देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक सुद्धा आहे.
आरबीआयने देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेच्या यादीत एसबीआयचा पहिल्यांदा समावेश केला होता आणि आजही ही बँक या यादीत आहे. या सरकारी बँकेत करोडो ग्राहकांचे अकाउंट आहे.

कदाचित तुमचेही अकाउंट एसबीआय मध्ये असणार. दरम्यान एसबीआयच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि अगदीच कामाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयने म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाने स्टेट बँक ऑफ इंडियाला एक मोठा दणका दिला आहे.
खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआय कडून देशातील असंख्य बँकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. काही बँकांचे लायसन्स रद्द करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आरबीआय देशातील सहकारी सहकारी आणि खाजगी बँकांवर करडी नजर ठेवते. ज्या बँका आरबीआयच्या नियमांचे पालन करत नाहीत अशा बँकांवर आरबीआय कडून कारवाई सुद्धा केली जाते.
दरम्यान, आता एसबीआयने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच आरबीआयकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे.
एसबीआयवर काय कारवाई झाली
नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशाच्या मध्यवर्ती बँकेने देशातील पाच महत्त्वाच्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आरबीआयने देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
आरबीआयने एसबीआयवर कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबत आरबीआयकडून एक महत्त्वाचे परिपत्रक सुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहे.
या परिपत्रकानुसार एसबीआयने कर्ज, अग्रीम, वैधानिक आणि इतर प्रतिबंधक, ग्राहक संरक्षण- अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारामध्ये ग्राहक संरक्षण मर्यादित आणि चालू खाती उघडण्यासंदर्भातील निर्देशांचं पालन केलेले नव्हते
आणि म्हणूनच एसबीआयवर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी देशाच्या मध्यवर्ती बँकेने SBI वर 1 कोटी 72 लाख 80 हजार रुपयांच दंड ठोठावला आहे, अशी माहिती संबंधितांकडून प्राप्त झाली आहे.
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
नुकत्याच काही दिवसांपूर्वी आरबीआयने बँक ऑफ महाराष्ट्र सहित देशातील 5 बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली होती आणि आता एसबीआयवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचा मोठा निर्णय आरबीआयकडून घेण्यात आला आहे.
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने ही दंडात्मक कारवाई केली असून या कारवाईचा ग्राहकांवर थेट कोणताच परिणाम होणार नाही. आरबीआय एसबीआय कडून जो दंड वसूल करणार आहे
त्या सर्व दंडाचे पैसे एसबीआय स्वतः भरेल यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार नाही. आरबीआयच्या या कारवाईचा एसबीआय आणि त्यांच्या ग्राहकांमधील व्यवहारांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही. यामुळे आरबीआयच्या या कारवाईमुळे ग्राहकांनी घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही.