Banking News : नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीलाच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आरबीआयच्या अधिकृत हँडलवर उपलब्ध माहितीनुसार या महिन्यात बँका 13 दिवसांसाठी बंद राहणार आहेत. यामुळे ज्यांना नोव्हेंबर मध्ये बँकेशी निगडित कामे करायची असतील त्यांनी या वेळापत्रकानुसारच आपल्या कामांचे नियोजन करणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.
खरे तर आता भरपूर कामे ऑनलाईन होतात. पण काही कामे अशी आहेत जी की बँकेत गेल्याशिवाय होत नाहीत. तुम्ही देखील अशाच काही कामांसाठी बँकेत हजेरी लावणार असाल तर नक्कीच तुम्ही आरबीआयची ही सुट्ट्यांची यादी फॉलो करायला हवी.

थोडक्यात या महिन्यात बँका अनेक दिवसांसाठी बंद राहणार असल्याने बँकिंग व्यवहारांची नियोजनपूर्व तयारी करणे आवश्यक ठरणार आहे. आरबीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, देशभरातील बँका ह्या महिन्यात एकूण 13 दिवस बंद राहतील.
या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय, प्रादेशिक तसेच शनिवार-रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे. पण सुट्ट्यांचे वेळापत्रक सर्व राज्यांसाठी समान राहणार नाही, स्थानिक सण व प्रथा यानुसार बँका वेगवेगळ्या दिवशी बंद राहतील.
थोडक्यात जर आज महाराष्ट्रात बँका बंद असतील तर इतर राज्यांमध्ये त्या बँका सुरू राहतील. म्हणजे या सुट्ट्या राज्यानुसार बदलणार आहेत. यामुळे नेमक्या कोणत्या राज्यात बँका बंद राहणार आणि कोणत्या तारखेला बंद राहणार यामुळे आरबीआयने जाहीर केलेले वेळापत्रक काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
कसे आहे सुट्ट्याचं वेळापत्रक
1 नोव्हेंबर – महिन्याच्या सुरुवातीला कर्नाटकात कन्नड राज्योत्सव आणि उत्तराखंडमध्ये इगास-बागवाल साजरे
होणार असल्याने त्या राज्यांतील बँका बंद राहतील.
2 नोव्हेंबर – रविवार निमित्ताने सुट्टी असेल.
5 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा आणि रास पौर्णिमा या महत्त्वाच्या सणांच्या निमित्ताने दिल्ली, मुंबई, नागपूर, जयपूर, कोलकाता, लखनौ, रांची, श्रीनगर, भुवनेश्वर, चंदीगड यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
6 नोव्हेंबर – शिलाँगमध्ये नोंगक्रेम नृत्य आणि मेघालयात वांगाला महोत्सव साजरे केले जाणार असल्याने या राज्यातील बँका बंद राहतील.
7 नोव्हेंबर – वांगला उत्सवानिमित्त सर्व बँका बंद राहतील.
8 नोव्हेंबर – बंगळुरुत कनकदास जयंतीनिमित्त बँका बंद राहतील. या दिवशी दुसरा शनिवार सुद्धा आहे म्हणून संपूर्ण देशभरात बँका बंद राहतील.
9 नोव्हेंबर – रविवार असल्याने संपूर्ण देशभरात सुट्टी राहणार आहे.
11 नोव्हेंबर- सिक्कीममध्ये ल्हाबाब दुचेन निमित्त बँकांना सुट्टी राहणार आहे. बौद्ध धम्मासाठी खास दिवस आहे.
16 नोव्हेंबर – रविवार असल्याने संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी राहणार आहे.
22 नोव्हेंबर – चौथा शनिवार निमित्ताने या दिवशी देखील देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.
23 नोव्हेंबर – रविवार असल्याने या दिवशी देशातील बँका बंद राहणार आहेत.
30 नोव्हेंबर – रविवार निमित्ताने या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.
ग्राहकांना या सुट्ट्यांचा विचार करून आपल्या व्यवहारांचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः रोख रकमेची गरज भासणार असल्यास एटीएममधून पैसे आधीच काढण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तथापि, डिजिटल बँकिंग, यूपीआय, नेट बँकिंग आणि मोबाइल अॅप्सच्या सेवा या कालावधीतही नेहमीप्रमाणे सुरू राहतील, त्यामुळे ऑनलाइन व्यवहारात कोणतीही अडचण येणार नाही.
रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, या सुट्ट्या विविध राज्यांतील स्थानिक सण, उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांनुसार निश्चित केल्या गेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आपले बँकिंग कामकाज नियोजनपूर्वक पार पाडावे, अन्यथा आवश्यक व्यवहारात विलंब होण्याची शक्यता आहे.













