10 रुपयांच्या कॉइनबाबत रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून नवीन गाईडलाईन जारी ! समोर आली मोठी अपडेट

तुम्हीही 5-10 रुपयांचे किंवा 20 रुपयांचे कॉइन यूज करता का ? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरे तर अनेकांच्या माध्यमातून दुकानदार आणि टॅक्सी चालक दहा रुपयांचे कॉईन स्वीकारत नाहीत अशी तक्रार केली जात होती. यामुळे आरबीआय ने दहा रुपयांचे कॉइल चलनातून बाद केले आहेत का असा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला होता.

Published on -

Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून गेला काही महिन्यांमध्ये देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सोबतच आरबीआयने देशातील काही बँकांचे लायसन्स सुद्धा रद्द केले आहे आणि यामुळे सध्या बँक ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळतय.

अशातच आता आरबीआय कडून दहा रुपयांच्या कॉइनबाबत नवीन गाईडलाईन जारी करण्यात आली आहे. खरंतर आपल्यापैकी अनेक जण दहा रुपयांचे कॉइन वापरत असतील, छोट्या मोठ्या व्यवहारांसाठी आपण पाच दहा रुपयांचे कॉइन वापरत असतो.

भाजीपाला खरेदी करण्यासाठी किंवा अशाच छोट्या मोठ्या कारणांसाठी दहा रुपयांचे कॉइन मोठ्या प्रमाणात वापरले जातात. दरम्यान जर तुम्हीही दहा रुपयांचे कॉइन वापरत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.

दुकानदार तसेच टॅक्सी चालक दहा रुपयांचा कॉइन देत नाहीत!

खरंतर अनेक ठिकाणी दुकानदारांकडून तसेच त्याची चालकांकडून दहा रुपयांचा कॉइन घेतला जात नाहीये. तुम्हाला देखील अशा अडचणींचा सामना करावाच लागला असेल. यामुळे साहजिकच सर्वसामान्यांच्या मनात दहा रुपयांचे कॉइन बंद करण्यात आले आहेत की काय?

असा सवाल उपस्थित होत होता. दरम्यान, आता याच संदर्भात आरबीआय कडून एक नवीन गाईडलाईन जारी करण्यात आली आहे. दहा रुपयांचे कॉईन वैध आहेत की नाहीत? याबाबत आरबीआयने मोठी माहिती दिली आहे.

RBI ची गाईडलाईन काय सांगते ?

जर तुम्हालाही 10 चे नाणे वापरताना अडचण येत असेल, जर कोणी तुमच्याकडून दहा रुपयांचा कॉइन घेत नसेल तर चिंता करू नका कारण की, दहा रुपयांचे कॉईन हे वैध चलन आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, स्वतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून हे कॉइन पूर्णपणे वैध चलन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वास्तविक, आरबीआयने नव्या गाईडलाईन मध्ये हे स्पष्ट केले आहे की, भारतीय चलनातील 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांची नाणी केवळ पूर्णपणे वैध नाहीत तर त्यांचे चलनही पूर्ण वेगाने सुरू आहे.

म्हणजेच या सर्व कॉइन चा व्यवहारांमध्ये वापर होतोय. बँक सुद्धा हे कॉइन स्वीकारत आहेत. मात्र, आरबीआय ने आपल्या नव्या गाईडलाईन मध्ये असे सुद्धा स्पष्ट केले आहे की या नाण्यांचे डिझाइन वेळोवेळी निश्चितपणे बदलले जातात, परंतु ही नाणी पूर्णपणे कायदेशीर आहेत आणि त्यांच्या चलनावर कोणताही परिणाम होणार नाही.

दुसरीकडे, आरबीआयने आतापर्यंत कोणती नाणी चलनातून बाद केली आहेत याची सुद्धा माहिती दिलेली आहे. आरबीआयने आतापर्यंत 25 पैसे आणि त्यापेक्षा कमी किमतीची नाणी चलनातून बाद केलेली आहेत.

पण आता प्रश्न असा उभा राहतो की जर कोणी दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास मनाई केली तर मग अशा परिस्थितीत आपण काय ॲक्शन घेऊ शकतो. दरम्यान आता याचबाबत तज्ञांकडून देण्यात आलेले माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

दहा रुपयांचे कॉइन एखाद्याने स्वीकारले नाही तर

जर दुकानदाराने किंवा टॅक्सी चालकाने दहा रुपयाचे कॉइन स्वीकारले नाही तर अशावेळी काय केले जाऊ शकते? हा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात होता. दरम्यान आता याच संदर्भात तज्ञांकडून मोठी माहिती देण्यात आली आहे.

जे लोक दहा रुपयांचे कॉइन स्वीकारत नसतील त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केले जाऊ शकते. कारण की चलनातील कॉइन न स्वीकारणे भारतीय दंड संहितेच्या कलम 489 (अ) ते 489 (इ) आणि चलन कायद्यानुसार कायदेशीर गुन्हा मानला जातो.

त्यामुळे जर तुमच्याकडून एखाद्याने दहा रुपयांचे कॉईन स्वीकारले नाही तर तुम्ही याबद्दल स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करू शकता. एवढेच नाही तर, तुम्ही राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोशी देखील संपर्क साधू शकता अशी माहिती जाणकारांकडून यावेळी देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News