Banking News : देशातील बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे देशातील जवळपास 11 राज्यांमध्ये काही बँका एक मे 2025 पासून बंद होणार आहेत. केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतला असून या निर्णयानंतर आपल्याला बँकिंग व्यवस्थेत एक मोठा बदल होताना पाहायला मिळणार आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्यापासून म्हणजेच एक मे पासून देशातील ग्रामीण बँकिंग व्यवस्थेत मोठा बदल होत आहे. कारण म्हणजे केंद्रातील मोदी सरकारच्या ‘एक राज्य, एक ग्रामीण बँक’ या नव्या धोरणांतर्गत 1 मे 2025 पासून देशभरातील जवळपास 15 ग्रामीण बँका बंद होणार आहेत.

या बँका थेट बंद केल्या जाणार नाहीत तर त्यांचे विलीनीकरण केले जाणार आहे. या बँकांचे संबंधित राज्यांतील इतर ग्रामीण बँकांमध्ये विलीनीकरण केले जाणार अशी माहिती जाणकार लोकांकडून प्राप्त झाली असून केंद्र सरकारच्या एक राज्य एक ग्रामीण बँक या नव्या धोरणाच्या माध्यमातून देशातील ग्रामीण बँकांची संख्या निम्म्याने कमी होईल अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार देशातील ग्रामीण बँकांची संख्या आता 43 वरून 28 वर येणार आहे. दरम्यान आता शासनाच्या एक राज्य एक ग्रामीण बँक या नव्या धोरणानंतर ज्या बँका विलीन होणार आहेत त्या बँकेच्या ग्राहकांवर नेमका काय परिणाम होणार, त्यांच्या पैशांचे काय होणार या प्रश्नांची उत्तर आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या राज्यांमधील बँका बंद होणार?
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकारच्या या निर्णयाचा आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, पश्चिम बंगाल व जम्मू-काश्मीर या 11 राज्यांतील ग्रामीण बँकांवर होणार आहे.
या संबंधित राज्यांमध्ये फक्त एकच ग्रामीण बँक राहणार आहे. म्हणजे संबंधित राज्यांमध्ये जेवढ्या ग्रामीण बँक असतील त्यांच्या विलीनीकरण केले जाईल आणि फक्त एकच ग्रामीण बँक राहील.
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
खरे तर शासनाच्या या निर्णयाचा ग्राहकांवर कोणता विपरीत परिणाम होणार नाही. ग्राहकांच्या पैशांवर यामुळे कुठल्याच प्रकारची गदा येणार नाही. ग्राहकांच्या खात्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, फक्त उद्यापासून हा निर्णय लागू होणार असल्याने बँकेचे नाव बदलेल आणि खातेदारांना नवीन पासबुक व चेकबुक मिळणार आहे.
या निर्णयामुळे संबंधित बँकेच्या ग्राहकांना आधीपेक्षा जलद सुविधा उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे बँक ग्राहकांना आधीपेक्षा चांगल्या सुविधा मिळणार असा दावा केला जातोय. सरकारच्या मते, या विलीनीकरणामुळे बँकिंग सेवा अधिक प्रभावी होणार असून डिजिटल सुविधा, पायाभूत सुविधा आणि ग्राहक सेवा यामध्ये सुधारणा होणार अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
मात्र या निर्णयानंतर बँक ग्राहकांचा खाते क्रमांक बदलणार आहे. दरम्यान, नवीन खाते क्रमांक SMSद्वारे कळवले जातील अशी सुद्धा माहिती संबंधितांच्या माध्यमातून समोर आली आहे.
खरेतर, ग्रामीण भागातील बँकिंग व्यवस्था मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दरम्यान आता या संबंधित राज्यांमधील ग्रामीण बँकेतील खातेदारांनी पुढील सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन जाणकार लोकांकडून करण्यात करण्यात आले आहे.