बँकेच्या वेळापत्रकात मोठा बदल ! पुढील 4 दिवस देशातील ‘या’ बँका बंद राहणार, RBI ने दिली मोठी माहिती

बँक खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशातील काही बँकांना उद्यापासून पुढील चार दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून स्वतः ही माहिती देण्यात आली आहे.

Published on -

Banking News : देशातील बँक ग्राहकांसाठी आजची बातमी फारच उपयुक्त ठरणार आहे. खरे तर एप्रिल महिना आता जवळपास संपण्यात जमा आहे, अवघ्या पाच दिवसांमध्ये एप्रिल महिना संपला आणि त्यानंतर नव्या मे महिन्याची सुरुवात होणार आहे.

दरम्यान एप्रिल महिन्याच्या शेवटी जर तुम्हाला बँकेशी निगडित काही महत्त्वाची कामे करायची असतील, त्यासाठी तुम्हाला बँकेत जायचं असेल तर तुमच्यासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.

खरे तर आपल्यापैकी अनेक जण बँकेच्या कामासाठी बँकेच्या दिशेने निघतात, बँकेतही पोहोचता मात्र त्यावेळी त्यांना समजतं की आज बँक बंद आहे. असे आपल्यापैकी अनेकांसोबत घडलं असेल. दरम्यान, जर तुमच्याही सोबत मागे असं घडलं असेल तर तुम्ही बँकेला कोणत्या दिवस सुट्टी असते याची माहिती ठेवणे आवश्यक आहे.

जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागणार नाही. खरंतर आरबीआयकडून बँकेच्या सुट्ट्यांची यादी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते.

दरम्यान आरबीआय ने आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून पुढील चार दिवस विविध कारणांमुळे देशातील काही बँका बंद राहणार आहेत.

देशातील सर्वच बँका बंद राहणार नाहीत मात्र ठराविक राज्यांमधील बँका पुढील चार दिवस बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत, आता आपण कोणत्या राज्यातील बँका कोणत्या दिवसांसाठी बंद राहतील याची माहिती जाणून घेणार आहोत.

पुढील चार दिवस कोणत्याही बँका बंद राहणार

26 एप्रिल 2025 : या दिवशी चौथा शनिवार येतोय त्यामुळे देशभरातील सर्वच बँका या दिवशी बंद राहतील.

27 एप्रिल 2025 : रविवार असल्याने या दिवशी सुद्धा संपूर्ण देशातील बँका बंद राहणार आहेत.

29 एप्रिल 2025 : 28 एप्रिलला देशभरातील बँका सुरू राहणार आहेत पण 29 एप्रिल रोजी परशुराम जयंती असल्याने या दिवशी एका राज्यात बँका बंद राहतील. हिमाचल प्रदेश मध्ये या दिवशी बँकांना सुट्टी राहणार आहे पण उर्वरित राज्यांमध्ये बँका सुरू राहतील.

30 एप्रिल 2025 : या दिवशी बसव जयंती आणि अक्षय तृतीयेच्या निमित्ताने कर्नाटक मधील बँकांना सुट्टी राहणार आहे. मात्र इतर राज्यांमध्ये बँका सुरळीत सुरू राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News