देशातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 बँका कोणत्या ? RBI ने सांगितली नावे, पहा यादी

देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या? तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? नाही ना मग आज आपण देशातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 बँकांची माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

Banking News : अलीकडील काही वर्षांमध्ये देशातील अनेक बँका बंद झाल्या आहेत. बँकेतील गैरव्यवहारांमुळे बँकेची आर्थिक स्थिती खराब होऊन बँक बंद झाल्याच्या कित्येक घटना तुम्ही पाहिल्या असतील. अशा परिस्थितीत मात्र संबंधित बँक खातेधारकांचे मोठी नुकसान होत असते.

बँक बुडाली की खातेधारकांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळते मात्र त्यापेक्षा जास्तीची रक्कम त्यांना परत मिळू शकत नाही. हेच कारण आहे की अनेक जण देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांमध्ये पैसे ठेवण्याचा विचार करतात.

सुरक्षित बँकेतच एफडी करायची असा ग्राहकांचा विचार असतो. दरम्यान जर तुम्हीही देशातील सुरक्षित बँकांच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा राहणार आहे. कारण की आज आपण देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी पाहणार आहोत.

खरे तर आरबीआयकडून गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक सहकारी खाजगी तसेच सरकारी बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही बँकांचे लायसन्स सुद्धा आरबीआयकडून रद्द करण्यात आले आहे. काही बँकांची आर्थिक स्थिती खराब झाली असल्याने त्यांच्यावर काही निर्बंध लादले गेले आहेत. यामुळे बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.

अनेक जण आपला पैसा सुरक्षित राहावा यासाठी बँकेत पैसा ठेवतो. मात्र बँका जर अशाच बुडत राहिल्या तर पैसे कुठे सुरक्षित राहतील ? असा सवाल सर्वसामान्य ग्राहक उपस्थित करत आहेत. दरम्यान, आज आपण देशातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 बँका कोणत्या आहेत याबाबतचा आढावा घेणार आहोत.

या आहेत देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका

रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय ही मध्यवर्ती बँक देशातील सर्वच खाजगी सरकारी तसेच सहकारी आणि NBFC यांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवून असते. बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते. ज्या बँका आरबीआयच्या नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा होते.

दरम्यान आरबीआय ने नुकतीच एक सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये देशातील दहा बँकांचा समावेश आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पॉटन्सच्या आधारावर दहा बँकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

खरे तर आधी या यादीमध्ये फक्त तीन बँकांचा समावेश होता मात्र आता यात दहा बॅंका समाविष्ट झाल्या आहेत. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया येते. दुसऱ्या क्रमांकावर देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँक आहे.

आणि तिसऱ्या क्रमांकावर देशातील सर्वात मोठी दोन नंबरची खाजगी बँक आयसीआयसीआय बँक आहे. जाणकार लोक सांगतात की, आरबीआयने जारी केलेल्या या यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्वच्या सर्व दहा बँका देशातील सर्वात सुरक्षित बँका मानल्या गेल्या आहेत.

आरबीआयने सांगितलेल्या सुरक्षित बँकांची यादी खालील प्रमाणे

स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एक्सिस बँक, इडून्सलॅन्ड बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, यूनियन बँक आणि कॅनरा बँक या 10 बँका या यादीत ठेवण्यात आल्या आहेत. म्हणजे या सर्व बँका आरबीआयच्या मते देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका आहेत. त्यात ठेवलेला पैसा बुडणे जवळपास अशक्य आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe