जून महिन्यात कोण – कोणत्या दिवशी बँकांना सुट्टी राहणार ? आरबीआयने जाहीर केली नवीन यादी

पुढील महिन्यात तुम्हाला बँकेत जाऊन काही महत्त्वाची कामे करायची आहेत का ? तर मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. आज आपण जून महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार ? याची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Banking News : मे महिना आता जवळपास संपण्यात जमा आहे. येत्या तीन दिवसांनी नव्या जून महिन्याला सुरुवात होईल आणि अनेक जण नव्या महिन्यात बँकेशी निगडित कामे करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे.

जर तुम्हाला बँकेत जाऊन महत्त्वाची कामे करायची असतील तर तुम्ही आजची बातमी शेवटपर्यंत वाचायला हवी कारण की आज आपण जून महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार कोणकोणत्या तारखेला बंद राहणार याचा सविस्तर आढावा घेणार आहोत.

आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, भारतातील बँकांच्या सुट्ट्या देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कॅलेंडरनुसार निश्चित केल्या जातात. दर महिन्याला RBI कडून बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली जात असते.

या चालू मे महिन्यातही आरबीआय कडून ही यादी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि आता जून महिन्यातही बँका किती दिवस बंद राहणार याची यादी आरबीआयकडून जाहीर करण्यात आली आहे.

यात राष्ट्रीय, प्रादेशिक आणि धार्मिक सुट्ट्या तसेच दर महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश असतो. यानुसार पुढील जून महिन्यात देशातील विविध राज्यांमधील बँका 13 दिवस बंद राहणार आहेत. म्हणजेच सगळीकडे तेरा दिवस बँकांना सुट्ट्या राहणार नाहीत, सुट्ट्या राज्यानुसार असतील.

जून महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार

एक जून 2025 : जून महिन्याची सुरुवात रविवाराने होत आहे आणि यामुळे या दिवशी देशभरातील बँका बंद राहतील.

6 जून 2025 : ईद-उल-अधा म्हणजे बकरीद निमित्त या दिवशी देशातील काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी राहणार आहे. तिरुवनंतपुरम आणि कोचीमध्ये या दिवशी बँका बंद राहतील अशी माहिती आरबीआयच्या वेबसाईटवरून मिळाली आहे.

7 जून 2025 : या दिवशी बकरीद ईद उल जुहा निमित्त देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. 

8 जून 2025 : रविवार निमित्ताने या दिवशी साप्ताहिक सुट्टी राहणार असून देशभरातील बँका या दिवशी बंद राहतील.

11 जून 2025 : संत गुरु कबीर जयंती निमित्त देशातील काही राज्यांमध्ये बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गंगटोक आणि शिमला येथील बँका बंद राहणार असल्याची माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे.

14 जून 2025 : प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी देशातील बँका बंद राहतात यानुसार या दिवशी जून महिन्याच्या दुसरा शनिवार येत असल्याने देशभरातील सर्वच बँका बंद राहतील.

15 जून 2025 : रविवार म्हणजेच साप्ताहिक सुट्टी असल्याने या दिवशी देशातील सर्वच बँका बंद राहतील. 

 21 जून 2025 : वटपोर्णिमा निमित्ताने मुंबई आणि बेलापूर मधील बँका बंद राहणार आहे.

 22 जून 2025 : रविवार असल्याने देशभरातील बँका या दिवशी बंद राहतील.

 26 जून 2025 : जम्मू आणि काश्मीर स्थापना दिवस असल्याने या दिवशी जम्मू आणि श्रीनगर मध्ये बँका बंद राहणार आहेत.

28 जून 2025 : प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी बँका बंद राहतात, यानुसार या दिवशी जून महिन्याचा चौथा शनिवार येतोय आणि यामुळे देशातील सर्वच बँकाना सुट्टी राहणार आहे.

29 जून 2025 : रविवार असल्याने या दिवशी देशातील सर्वच बँका बंद राहतील.

30 जून 2025 : रेमना नी निमित्त या दिवशी ऐझवाल (मिझोरम) मध्ये बँकांना सुट्टी राहणार असल्याची माहिती आरबीआयकडून प्राप्त झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe