बँकांना खरंच आठवड्यातुन दोन दिवसांची सुट्टी मिळणार का ? सरकारने संसदेत दिली मोठी माहिती

बँक ग्राहकांसाठी तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बँक कर्मचाऱ्यांचा कामाचा आठवडा पाच दिवसांचा करणेबाबत सरकारकडून संसदेत मोठी माहिती देण्यात आली आहे. 

Published on -

Banking News : बँक ग्राहकांसाठी तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून कामाचा आठवडा पाच दिवसांचा करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. यासाठी बँक कर्मचारी संघटनांकडून सरकारकडे जोरदार पाठपुरावा सुद्धा केला जात आहे.

बँकांना प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सुट्टी असायला हवी अशी मागणी उपस्थित करण्यात आली आहे. दरम्यान आता या संदर्भात संसदेत सरकारकडून मोठी माहिती देण्यात आली आहे. सध्या केंद्रीय विधिमंडळाचे म्हणजेच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच पावसाळी अधिवेशनात संसदेत बँक कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला.

सरकार बँकांना आठवड्यातून फक्त 5 दिवस काम करण्याची परवानगी देणार आहे का ? की बँकांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे लागू करण्यास विलंब होत आहे ? असे प्रश्न संसदेत उपस्थित झाले. यावर सरकारकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले.

सरकारने काय सांगितले 

संसदेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी असे म्हणाले आहेत की, IBA म्हणजे इंडियन बँक्स असोसिएशनने सरकारला एक प्रस्ताव पाठवला आहे, ज्यामध्ये दर शनिवारी बँकिंग सुट्टी जाहीर करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

म्हणजेच, फक्त दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीच नव्हे तर प्रत्येक शनिवारी बँकांना सुट्टी असायला हवी अशी मागणी उपस्थित करण्यात आली आहे. खरंतर ऑगस्ट 2015 मध्ये सरकारने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट, 1881 अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकिंग सुट्टी जाहीर केली होती, जी अजूनही लागू आहे.

आता IBA कडून प्रत्येक शनिवारी सुट्टी असायला हवी अशा आशयाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र आता प्रश्न असा उपस्थित होतो की सरकार या प्रस्तावावर काय कार्यवाही करत आहे.

तर यावर उत्तर देताना अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी हा प्रस्ताव सध्या विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रस्तावावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. पण सरकार यावर विचार करत आहे म्हणजेच आगामी काळात या संदर्भात सरकारकडून योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. 

बँक कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे निर्णयास विलंब होतोय का 

 संसदेत बँक कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कामाचा आठवडा पाच दिवस करणे बाबतच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यास विलंब होत आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर उत्तर देताना पंकज चौधरी यांनी सध्या बँक कर्मचाऱ्यांची कोणतीच कमतरता नाही असे स्पष्ट केले आहे.

त्यांनी असेही सांगितले की, 31 मार्च 2025 पर्यंत देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 96 कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित 4% कपात निवृत्ती, राजीनामा आणि इतर अनियोजित कारणांमुळे पद सोडलेल्या कर्मचाऱ्यांमुळे रिक्त आहेत आणि जी की एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

त्यांनी असेही स्पष्ट केले की, प्रत्येक बँक त्यांच्या स्वतःच्या गरजांनुसार कर्मचाऱ्यांची संख्या ठरवते, ज्यामध्ये त्यांच्या व्यवसायाची पातळी, शाखांची संख्या, निवृत्ती आणि इतर घटकांचा सुद्धा समावेश असतो. या गरजांनुसार नवीन भरती सुद्धा केली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!