दोन बँकेत खाती असतील तर 10 हजार रुपये दंड भरावा लागणार ? RBI चे नियम काय सांगतात?

ज्या लोकांचे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असतील त्यांनी व्यवहार करताना थोडे जपून व्यवहार करायला हवेत. आरबीआयने जारी केलेल्या नव्या नियमानुसार, तुमच्या खात्यांमधून जर संशयास्पद व्यवहार होत असेल तर तुमच्या अडचणीत वाढ होणार आहे. जर तुमच्या बँक अकाउंट मध्ये काही संशयास्पद व्यवहार आढळून आले तर अशावेळी आरबीआयच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटची कसून चौकशी होईल आणि तुम्ही दोषी आढळले तर तुमच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Banking News

Banking News : तुमचेही कोणत्या ना कोणत्या बँकेत अकाउंट असेल नाही का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची आहे. विशेषता ज्यांचे दोन बँक अकाउंट असतील त्यांच्यासाठी आजची बातमी विशेष कामाची ठरणार आहे. खरंतर, 2014 मध्ये मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यापासून देशात बँक खातेधारकांची संख्या वाढली आहे. बँकेतील ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

अगदी खेड्यापाड्यात देखील आता बँक ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते. बँक ग्राहकांची संख्या वाढली असल्याने आता पैशांचे व्यवहार देखील खूपच सोपे झाले आहेत. अनेकजण नेट बँकिंगच्या माध्यमातून आणि यूपीआयच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करत आहेत.

त्यामुळे भारतात कॅशलेस इकॉनॉमीला चालना मिळाली आहे आणि ही देशासाठी खूपच सकारात्मक बाब आहे. आता भाजीपाला जरी खरेदी करायचा असेल तरी देखील तिथे फोन पे, गुगल पे यांसारख्या युपीआय एप्लीकेशनच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार होत आहेत. पण, अनेकांना आरबीआयच्या नियमासंदर्भात फारशी माहिती नाहीये.

दरम्यान काही लोकांच्या माध्यमातून जर एखाद्या व्यक्तीचे दोन बँक अकाउंट असतील तर त्यांना दंड भरावा लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. सोशल मीडियामध्ये देखील मागे अशीच एक पोस्ट वायरल झाली होती ज्यामध्ये दोन बँक अकाउंट असणाऱ्या ग्राहकांना दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो असे म्हटले गेले होते.

त्यामुळे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असणाऱ्या ग्राहकांचे धाबे दणाणले होते. पण यामागे सत्यता नेमकी काय आहे, आरबीआयचे दोन बँक अकाउंट असणाऱ्या ग्राहकांसाठी काय स्पेशल नियम आहेत याच बाबत आज आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरे तर ज्या लोकांचे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट असतील त्यांनी व्यवहार करताना थोडे जपून व्यवहार करायला हवेत. आरबीआयने जारी केलेल्या नव्या नियमानुसार, तुमच्या खात्यांमधून जर संशयास्पद व्यवहार होत असेल तर तुमच्या अडचणीत वाढ होणार आहे.

जर तुमच्या बँक अकाउंट मध्ये काही संशयास्पद व्यवहार आढळून आले तर अशावेळी आरबीआयच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटची कसून चौकशी होईल आणि तुम्ही दोषी आढळले तर तुमच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे. जर तुमच्या बँक खात्यात काही संशयास्पद व्यवहार झाले आहेत याची पुष्टी झाली तर अशावेळी तुमचे बँक अकाउंट गोठवले जाऊ शकते आणि तुमच्यावर दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते.

मात्र, आरबीआयच्या नव्या नियमांमध्ये दोन बँक अकाउंट असणे बेकायदेशीर नाहीये. म्हणजेच तुमचे एकापेक्षा अधिक बँक अकाउंट असतील तर तुम्हाला कोणताच दंड लागणार नाही. खरे तर अनेकजण पगारासाठी वेगळे अकाउंट म्हणजेच सॅलरी अकाउंट आणि इतर व्यवहारांसाठी सेविंग अकाउंट ओपन करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe