Banking Shares : आज रिझर्व बँक ऑफ इंडिया ने पाच वर्षांनंतर एक मोठा निर्णय घेतला. आरबीआयकडून आज पाच वर्षांनी पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली. MPC च्या 6 सदस्यांची तीन दिवस बैठक झाले आणि या बैठकीनंतर आज आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 0.25 टक्यांची कपात करण्यात आली असल्याची मोठी घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे आता गेल्या दोन वर्षांपासून स्थिर असलेले रेपो रेट बदलले आहेत.
आतापर्यंत रेपो रेट 6.50% इतके होते मात्र यामध्ये 0.25 टक्क्यांची घसरण झाली असून रेपो रेट 6.25 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. या आरबीआयच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून गृह कर्जाचे सर्व प्रकारचे कर्ज स्वस्त होणार आहे. सर्व प्रकारच्या कर्जावरील ईएमआय आता कमी होणार आहे.
यामुळे साहजिकच सर्वसामान्य नागरिकांकडे अधिकचा पैसा शिल्लक राहणार आहे आणि कर्जाचे ओझे देखील आता नागरिकांना फारसे जड जाणार नाही. आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात केली म्हणून शेअर बाजारात तेजी येणे अपेक्षित होते. मात्र आज शेअर बाजारात परिस्थिती उलट पाहायला मिळाली. रेपो रेट मध्ये कपातीचा निर्णय घेतला असला तरी शेअर बाजारात आज घसरण झाली.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये आज घसरण झाली. अशा परिस्थितीत आज आपण आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात केल्यानंतरही शेअर बाजारात तेजी का दिसली नाही? तसेच या निर्णयानंतरही बँकिंग स्टॉक मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा का दिसली नाही? यामागील कारणे थोडक्यात जाणून घेणार आहोत.
शेअर बाजारात घसरणीचे कारण
आज रेपो रेटमध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय झाला पण शेअर बाजारात तेजी दिसली नाही याचे कारण म्हणजे बाजाराला या कपातीचा आधीच अंदाज होता. अनेक जाणकारांनी आधीच रेपो रेट मध्ये कपात होणार असे म्हटले होते. पाच वर्षांनी पहिल्यांदाच आरबीआय रेपो रेट कमी करणार असा अंदाज साऱ्यांकडून वर्तवला जात होता.
त्यामुळे एकप्रकारे बाजाराला आधीच या कपातीचा अंदाज होता. दरम्यान, या आर्थिक वर्ष 2025 साठी आरबीआयच्या शेवटच्या पतधोरणाच्या घोषणेचा फटका बँकिंग स्टॉकला बसला कारण तरलता आणखी मऊ करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.
CRR कायमचं राहिला
7 फेब्रुवारी 2025 च्या आधी 6 डिसेंबर 2024 रोजी एमपीएससीची बैठक झाली होती. गत MPC बैठकीत, तत्कालीन RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी CRR म्हणजेच रोख राखीव प्रमाण 0.50 टक्क्यांनी कमी करून 4 टक्के केले होते. त्याआधी हे प्रमाण 4.50% इतके होते.
CRR हा बँकेच्या एकूण ठेवींचा एक भाग आहे जो आरबीआयकडे राखीव म्हणून ठेवला जातो आणि जर त्यात कपात केली तर ते बँकेकडे अधिक रोख उपलब्ध करते आणि प्रणालीमध्ये तरलता वाढवते. याशिवाय आरबीआयने तरलता वाढवण्यासाठी जानेवारीमध्ये 1.5 लाख कोटी रुपये सिस्टीममध्ये टाकले होते.
अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांना अपेक्षा होती की रेपो दरात कपात करण्यासोबतच आरबीआय सिस्टममध्ये तरलता वाढवण्यासाठी इतरही काही महत्वाच्या घोषणा करणार. मात्र एमपीसीच्या बैठकीनंतर आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या भाषणात अशी कोणतीही घोषणा ऐकू न आल्याने बँकिंग स्टॉकमध्ये मोठी घसरण झाली असावी असा अंदाज जाणकार लोकांकडून व्यक्त केला जात आहे.
तज्ञ काय सांगतात?
शेअर मार्केट मधील सध्याच्या या घसरणीबाबत अन आरबीआयच्या या निर्णयानंतर एमके ग्लोबलच्या माधवी अरोरा यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, तरलतेशी संबंधित घोषणा न झाल्यामुळे बाजारात निराशा आहे, परंतु अशा घोषणा एमपीसीच्या बैठकीनंतरच कराव्यात असा काही लिखित नियम नाही. गरज पडल्यास तरलतेशी संबंधित घोषणा कधीही केली जाऊ शकते. दुसरीकडे जास्त लिक्विडिटी असणे हे सुद्धा घातक ठरते, असे ऑपिनियन तज्ञांकडून देण्यात आले आहे.