Bay Of Bengal Cyclone : अलीकडेच बंगालच्या उपसागरात दाना नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळामुळे भारतातील काही राज्यांना मोठा फटका बसण्याची भीती आहे. दरम्यान अर्थात 24 ऑक्टोबरला ओडिशाच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकले असल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले आहे.
ओडिशा राज्यातील भद्रक जिल्ह्यातील धामरा या ठिकाणी काल हे चक्रीवादळ पोहोचले. या चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्राला कोणताच धोका नाहीये. या चक्रीवादळामुळे राज्यातील समुद्रकिनारपट्टीवरही कोणताच विपरीत परिणाम होणार नाहीये.

पण हे चक्रीवादळ देशातील बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कहर माजवणार अशी भीती व्यक्त होत आहे. हे वादळ ओडिशामध्ये धडकले तेव्हा याचा वेग 120 किलोमीटर प्रति तास एवढा होता. मात्र नंतर या वादळाचा वेग कमी झाला.
वादळाचा वेग कमी झाल्याने त्याची तीव्रता हळूहळू कमी होणार हे स्पष्ट होत आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने हे चक्रीवादळ कधी संपणार? याबाबत मोठे अपडेट दिले आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी, 25 ऑक्टोबर 2024 ला म्हणजेच आज संध्याकाळपर्यंत ओडिशामध्ये त्याचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. दानामुळे शुक्रवारी सकाळी ओडिशा आणि बंगालच्या अनेक भागात ताशी १०० ते १२० किमी वेगाने जोरदार वारे वाहत होते.
मात्र काल सायंकाळी या चक्रीवादळाचा वेग कमी झाला आणि वाऱ्याचा वेग कमी झाल्याने याची तीव्रता देखील कमी होत गेली. पण या चक्रीवादळाचा प्रभाव म्हणून ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
परंतु, आत्तापर्यंत या चक्रीवादळामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. तथापि अनेक ठिकाणी या वादळामुळे झाडे उन्मळली आहेत, विजेचे खांब पडले आहेत, काही घरांचेही नुकसान झालेले आहे.
मात्र या चक्रीवादळामुळे अजून कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून आर्थिक हानीचे प्रमाणही फारच कमी असल्याने ही बाब मोठी दिलासादायक असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे आज हे चक्रीवादळ संपणार आहे. आज म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत चक्रीवादळ हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव आज दुपारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
यानंतर मात्र याची तीव्रता कमी होणार आहे. तथापि या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओडिशा मधील काही जिल्ह्यांना आज हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.