अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- भारताचे प्रसिद्ध उद्योजक, दानवीर रतन टाटा यांचा आज वाढदिवस आहे. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर, 1937 ला झाला. आज त्यांनी वयाची 84 वर्षे पूर्ण केली आहेत.( Ratan Tata)
आज आपण त्यांच्या काही अनोख्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया…
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/12/Be-sure-to-know-these-things-about-Ratan-Tata.jpg)
रतन टाटा यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सोनू टाटा होते.
त्यांच्या वडिलांनी दोन लग्न केली होती आणि रतन टाटा यांच्या सावत्र आईचे नाव सिमोन टाटा असे होते.
रतन टाटा अवघ्या 10वर्षांचे असतानाच त्यांचे आई-वडील विभक्त झाले. त्यामुळे त्यांच्या आजीनेच त्यांचे पालनपोषण केले.
मुंबईत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कॉर्नेट विद्यापिठातून आर्किटेक्चर बीएस आणि हॉवर्ड बिझनेस स्कूलमधून अॅडव्हॉन्स मॅनेजमेंट प्रोग्राम ही पदवी घेतली.
आयबीएमची नोकरी सोडून ते 1962 ला टाटा ग्रुपशी जोडले गेले. 1981 ला टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बनले.
नॅनो कार हा रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. यात त्यांना फायद्यापेक्षा नुकसानच जास्त झाले, पण भारतीयांना स्वस्तात कार देण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले.
1998 ला टाटाने टाटा इंडिका कार रस्त्यावर उतरवली आणि टाटाची ही आतापर्यंत सर्वाधिक विकली गेलेली कार आहे.
रतन टाटा हे पुस्तकप्रेमी आहेत. त्यांना लोकांच्या यशोगाथा वाचायला आवडतात. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, निवृत्तीनंतर ते त्यांच्या या छंदाला अधिक वेळ देत आहेत.
रतन टाटा 4 वेळा प्रेमात झाले. मात्र, त्यांनी आतापर्यंत लग्न केले नाही.
रतन टाटा हे दानशूरपणासाठीही ओळखले जातात. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी रतन टाटा समूहाकडून 1500 कोटी रूपयांची मदत करण्यात आली.
टाटा यांना सन 2000 मध्ये ‘पद्मभूषण’ तर 2008 मध्ये ‘पद्मविभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम