Apple चे नवे इअरफोन्स लॉन्च ! पहिल्यांदाच मिळणार हार्ट रेट ट्रॅकिंगसह 45 तासांची बॅटरी लाइफ | Powerbeats Pro 2

Tejas B Shelar
Updated:

Powerbeats Pro 2 : जगप्रसिद्ध टेक कंपनी Apple चा एक पार्ट असलेल्या Beats by Dr. Dre ह्या कंपंनीने भारतात 11 फेब्रुवारी 2025 रोजी नवीन पॉवरबीट्स प्रो 2 वायरलेस इअरफोन्स लाँच केले आहेत. हे इअरफोन्स विशेषतः खेळाडू आणि फिटनेस प्रेमींसाठी डिझाइन केलेले असून हार्ट रेट मॉनिटरिंग तंत्रज्ञानासह येतात. Apple च्या वेबसाइटवर हे इअरफोन्स जेट ब्लॅक, क्विक सँड, हायपर पर्पल आणि इलेक्ट्रिक ऑरेंज या चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. 13 फेब्रुवारीपासून भारतात याची विक्री होणार आहे.

Powerbeats Pro 2 मध्ये कोणते फीचर्स मिळणार ?

1. हार्ट रेट मॉनिटरिंग

बीट्स पॉवरबीट्स प्रो 2 इअरफोन्समध्ये LED ऑप्टिकल सेन्सर्स बसवले आहेत, जे प्रति सेकंद 100 पेक्षा जास्त वेळा रक्तप्रवाह तपासतात आणि तो डेटा संबंधित फिटनेस Apps वर रिअल-टाइममध्ये ट्रान्समिट करतात. भारतात हे इयरफोन्स Runna, Nike Run Club, Open Ladder, Slopes, आणि  YaoYao या सहा फिटनेस Apps सह सुसंगत असतील.

2. प्रीमियम डिझाइन

हे इअरफोन्स इअर-हूक डिझाइनसह येतात, जे बीट्सने जवळपास 1,000 खेळाडूंसह चाचणी करून विकसित केले आहे. या इअरफोन्समध्ये पाच वेगवेगळ्या आकारातील इअर टिप्स उपलब्ध आहेत, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला आरामदायी फिट मिळू शकेल.

  • निकेल-टायटॅनियम मिश्र धातूपासून बनलेले इअर हुक – अधिक टिकाऊ आणि लवचिक
  • IPX4 वॉटरप्रूफ रेटिंग – घाम आणि पाणी यापासून संरक्षण
  • अॅथलेटिक आणि स्पोर्टी लुक – फिटनेस आणि वर्कआउटसाठी उत्तम

3. ऑडिओ तंत्रज्ञान 

बीट्स पॉवरबीट्स प्रो 2 मध्ये डायनॅमिक हेड ट्रॅकिंग, अॅडॉप्टिव्ह EQ आणि ट्रान्सपरन्सी मोड आहेत.

  • डायनॅमिक हेड ट्रॅकिंग – आवाजाच्या दिशेनुसार ऑडिओ एडजस्ट करतो.
  • अॅडॉप्टिव्ह EQ – वापरकर्त्याच्या कानात इअरफोन्स कसे बसले आहेत यावर आधारित आवाज समायोजित करतो.
  • ट्रान्सपरन्सी मोड – बाहेरील आवाज सहज ऐकता येईल असा पर्याय

4. कनेक्टिव्हिटी आणि कंट्रोल्स 

हे इअरफोन्स अॅपल आणि अँड्रॉइड दोन्ही डिव्हाइसेसशी सुसंगत आहेत. Apple वापरकर्त्यांसाठी वन-टच पेअरिंग, ऑटोमॅटिक स्विचिंग, ऑडिओ शेअरिंग, हँड्स-फ्री सिरी आणि Find My Network या सुविधा मिळतात. अँड्रॉइडसाठी बीट्सच्या App द्वारे वन-टच पेअरिंग, हृदयगती निरीक्षण, कस्टमाइज करण्यायोग्य नियंत्रणे आणि Find My Beats सुविधा दिल्या जातात.

5. बॅटरी लाइफ

बीट्सच्या मते, पॉवरबीट्स प्रो 2 हे चार्जिंग केससह 45 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देऊ शकतात. प्रत्येक इअरबड 10 तासांपर्यंत प्लेबॅक देते, आणि 5 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगमध्ये 90 मिनिटांचा बॅकअप मिळतो. केस वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.

बीट्स पॉवरबीट्स प्रो 2 ची किंमत 

  • भारतामध्ये किंमत: ₹29,900
  • रंग पर्याय: जेट ब्लॅक, क्विक सँड, हायपर पर्पल, इलेक्ट्रिक ऑरेंज
  • विक्री सुरू होण्याची तारीख: 13 फेब्रुवारी 2025
  • खरेदीसाठी उपलब्ध: अॅपल इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर

फिटनेस आणि ऑडिओ प्रेमींसाठी सर्वोत्तम पर्याय!

या नवीन इअरफोन्समध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, डायनॅमिक हेड ट्रॅकिंग, अॅडॉप्टिव्ह EQ आणि 45 तासांची बॅटरी लाइफ असल्याने ते फिटनेस प्रेमींसाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरणार आहेत. जर तुम्ही वर्कआउट दरम्यान उत्तम ऑडिओ अनुभव शोधत असाल, तर पॉवरबीट्स प्रो 2 हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो!

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe