Best Colleges Of Maharashtra : दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. दहावीचा निकाल यंदा वेळेच्या आधीच जाहीर करण्यात आला आहे यामुळे विद्यार्थ्यांकडे कॉलेज शोधण्यासाठी आणि ऍडमिशनची प्रोसेस आरामात करता येण्यासाठी पुरेसा कालावधी सुद्धा आहे.
दरवर्षी दहावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मग जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. यंदा मात्र महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून सीबीएससी निकालाच्या आसपासच दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून 5 मे 2025 रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर अवघ्या आठ दिवसांमध्ये अर्थातच 13 मे 2025 रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आता पुढील प्रवेशासाठी कॉलेजची शोधा शोध सुरू आहे.
अशातच जर तुम्हीही अकरावीच्या प्रवेशासाठी उत्तम कॉलेजचा शोध घेत असाल तर आज आम्ही तुम्हाला मुंबईमधील टॉप 10 कॉलेजची माहिती सांगणार. या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतल्यास तुमची लाईफ सेट होऊ शकते.
मुंबईतील टॉप 10 कॉलेज
सेंट अँड्रिव्ह कॉलेज : मुंबईतील हे कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये फारच लोकप्रिय आहे. मुंबईमध्ये लोकप्रिय कॉलेजेस मध्ये या कॉलेजचा समावेश केला जातो. दहावीनंतर तुम्ही तुमच्या पुढील करिअर साठी याची निवड करू शकता.
आर. ए पोद्दार कॉलेज : जर तुम्हाला कॉमर्स सेक्टर मध्ये करिअर घडवायचे असेल तर हे कॉलेज तुमच्याचसाठी आहे. अकरावी कॉमर्स मध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुम्ही या कॉलेजचा विचार करू शकता. फायनान्स, बँकिंग, अकाउंट्समध्ये करिअर करायचे म्हणजेच कॉमर्समध्ये करिअर करायचे असेल तर नक्कीच हे कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे.
सोफिया कॉलेज : मुलींसाठी मुंबईतील हे कॉलेज सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. सोफिया कॉलेज ही फक्त मुलींसाठी आहे. या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यास तुमच्या करिअरला एक नवीन दिशा मिळणार आहे.
मिठीबाई कॉलेज : हे सुद्धा मुंबईमधील एक नामांकित कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये विद्यार्थी सायन्स आणि कॉमर्सला अधिक ऍडमिशन घेतात. जर तुम्हालाही सायन्स आणि कॉमर्स मध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुम्ही या कॉलेजला निवडू शकता.
एच.आर कॉलेज : एचआर कॉलेज सुद्धा मुंबईतील एक नामांकित कॉलेज आहे. कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स साठी हे कॉलेज बेस्ट राहणार आहे.
आर.डी नॅशनल कॉलेज : दहावीनंतर तुम्हाला कोणत्याही शाखेत प्रवेश घ्यायचा असेल म्हणजेच आर्ट, कॉमर्स आणि सायन्स यापैकी कोणत्याही शाखेत प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही या कॉलेजची निवड करू शकता.
सेंट झेव्हियर्स कॉलेज : हे मुंबईमधील एक उत्कृष्ट कॅम्पस असणारे कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. तुमच्या भविष्यासाठी हे कॉलेज फारच बेस्ट राहणार आहे.
एनएम कॉलेज : कॉमर्स शाखेत प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही या कॉलेजचा विचार करू शकता. राजधानी मुंबईतील हे एक बेस्ट कॉलेज आहे.
जय हिंद कॉलेज : मुंबईतील टॉप 10 कॉलेजेस मध्ये आपण या कॉलेजचा सुद्धा विचार करू शकतो. विद्यार्थ्यांसाठी या कॉलेजमध्ये विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत.
के सी कॉलेज : दहावीनंतर कॉमर्स आणि आर्ट फॅकल्टी मध्ये करिअर करायचे असेल तर हे कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे.