Best Engineering Branch : जेईई मेनचा रिझल्ट नुकताच जाहीर झाला आहे आणि यामध्ये चांगले गुण मिळवलेले, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता इंजीनियरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी तयारी करत आहे. विद्यार्थ्यांची कॉलेज प्रवेशाची तयारी जोरात सुरू आहे पण त्याचवेळी काही विद्यार्थी थोडेसे गोंधळलेले सुद्धा दिसत आहे.
कोणते कॉलेज निवडावे, कोणत्या ब्रांच मधून इंजिनिअरिंग पूर्ण करावी? या प्रश्नांनी विद्यार्थ्यांना गोंधळून टाकले आहे. दरम्यान जर तुमचाही असाच गोंधळ उडाला असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे.

खरेतर सगळ्यात आधी तुम्ही हे समजून घ्या की करिअर केवळ चांगल्या कॉलेजमुळे सेट होईल असे नाही तर तुमचं करिअर हे तुम्ही कोणत्या शाखेतून डिग्री कम्प्लीट करता यावर सुद्धा अवलंबून राहणार आहे.
यामुळे आज आपण कोणत्या ब्रांच मधून BTech केल्यास विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो याची माहिती जाणून घेणार आहोत.
या ब्रांचमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यास विद्यार्थ्यांना लाभ होणार
केमिकल इंजिनिअरिंग : रासायनिक प्रक्रिया, पर्यावरण आणि औद्योगिक संशोधनात रस असलेल्या विद्यार्थ्यांनी केमिकल इंजीनियरिंग करायला हवे.
केमिकल इंजीनियरिंग ही बीटेकची अशी एक ब्रांच आहे ज्यातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी सहज लागू शकते आणि हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांची लाईफ खऱ्या अर्थाने सेट होईल.
एरोस्पेस इंजिनिअरिंग : जर तुम्हाला विमाने, अंतराळयान आणि संशोधन या क्षेत्रात करिअर घडवायचं असेल तर तुमच्यासाठी एरोस्पेस इंजीनियरिंग चा कोर्स आहे. एरोस्पेस इंजीनियरिंग केल्यानंतर तुम्ही विमाने, अंतराळयान आणि संशोधन या अशा क्षेत्रात आपले करिअर बनवू शकता.
संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी (CSE) : कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग म्हणजेच संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी ही एक अशी शाखा आहे जी की कोडिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, डेटा सायन्समध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे.
ही बीटेकची एक लोकप्रिय शाखा आहे आणि या शाखेतून पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगला पगार सुद्धा मिळतो.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग : भारतात मेकॅनिकल इंजिनिअरिंग एक लोकप्रिय अभ्यासक्रम आहे. राज्यासहित संपूर्ण देशभरात मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या खरच उल्लेखनीय आहे.
हा देखील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा पर्याय ठरणार आहे. हा असा अभ्यासक्रम आहे जो की मशीन्स, ऑटोमोबाईल्स, रोबोटिक्स आणि एनर्जी सिस्टीममध्ये रस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ठरतो.
इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी : ज्या विद्यार्थ्यांना सर्किट, उपकरणे आणि पॉवर सिस्टीममध्ये रस आहे त्या विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग एक बेस्ट पर्याय राहणार आहे.
स्थापत्य अभियांत्रिकी : जर तुम्हाला पायाभूत सुविधा, बांधकाम आणि शहरी नियोजन या क्षेत्रात आवड असेल तर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगचा पर्याय निवडायला हवा. सिव्हिल इंजीनियरिंगची डिग्री प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी मिळते.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे डिग्री प्राप्त केल्यानंतर विद्यार्थी स्वतः देखील पायाभूत सुविधा, बांधकाम रिलेटेड स्वतःची कंपनी स्थापित करू शकता. ही डिग्री प्राप्त केल्यानंतर विद्यार्थी गव्हर्मेंट इंजिनिअर बनू शकता.