इंजीनियरिंगला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत आहात का? मग 12वी नंतर ‘या’ शाखेत ऍडमिशन घ्या, 100% लाईफ सेट होणार

बारावी सायन्सनंतर इंजीनियरिंग करण्याच्या तयारीत असाल तर आजचा लेख तुमच्याच कामाचा आहे. आज आपण इंजीनियरिंगच्या टॉप 3 कोर्सची माहिती पाहणार आहोत. 

Published on -

Best Engineering Courses : महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. बारावीचा निकाल पाच मे 2025 रोजी जाहीर झाला असून आता विद्यार्थी पुढील वर्गातील प्रवेशासाठी तयारी करत आहे. बारावी सायन्स मधून उत्तीर्ण झालेले बहुतांशी विद्यार्थी इंजिनिअरिंग करण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान जर तुमचाही असाच प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अलीकडच्या काळात इंजीनियरिंग क्षेत्राचा वेगाने विस्तार झाला आहे. आता देशातल्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये स्पेशलायझेशनसाठी विविध पर्याय सुद्धा उपलब्ध झाले आहेत.

परिणामी, देशभरातील विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण घेण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. खरे तर विद्यार्थी बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर मेकॅनिकल, केमिकल, कन्स्ट्रक्शन आणि कंप्यूटर इंजीनियरिंगला ऍडमिशन घेतात.

पण आज आपण अशा 3 महत्त्वाच्या इंजीनियरिंगच्या कोर्सेस ची माहिती जाणून घेणार आहोत जे कोर्स कम्प्लीट केल्यानंतर विद्यार्थ्यांना लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळणार आहे. हे कोर्स कम्प्लीट केल्यानंतर विद्यार्थ्यांचे आयुष्य पूर्णपणे सेट होणार आहे.

बारावीनंतर इंजीनियरिंगचे हे कोर्सेस करा

पेट्रोलियम इंजीनियरिंग : पेट्रोलियम इंजिनिअरिंग ही इंजिनिअरिंगची एक लोकप्रिय शाखा आहे. जाणकार लोक सांगतात की, यामध्ये कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा अभ्यास, उत्खनन व वितरण यावर लक्ष केंद्रित केलं जातं.

हे इंजिनिअरिंगचे असे एक क्षेत्र आहे जे की समुद्रातील प्लॅटफॉर्मवर काम करण्याची संधी देतं. यामुळे ज्या विद्यार्थ्यांची साहसी वृत्ती आहे आणि ज्यांची दूरवर काम करण्याची तयारी आहे अशा लोकांसाठी ही ब्रांच फायद्याची राहणार आहे. इंजीनियरिंगचा हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची नोकरी मिळणार आहे. 

सिव्हिल इंजिनिअरिंग : सिव्हिल इंजिनिअरिंग ही देखील इंजीनियरिंगची एक लोकप्रिय ब्रांच आहे. इंजिनिअरिंगच्या या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधांचं नियोजन, रचना आणि अंमलबजावणी याबाबतचे शिक्षण दिले जाते.

भारतात सुरू असलेल्या विविध बांधकाम प्रकल्पांमुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झालेल्या आहेत. यामुळे जर तुम्ही हा कोर्स केला तर तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होणार आहे. हा कोर्स केल्यानंतर तुमच आयुष्य शंभर टक्के सेट होणार आहे.

हायड्रोलॉजिकल इंजिनिअरिंग : हायड्रोलॉजिकल इंजिनिअरिंग ही सुद्धा इंजिनिअरिंगची एक लोकप्रिय शाखा आहे. हायड्रोलॉजिकल इंजीनियरिंग मध्ये विद्यार्थ्यांना जलस्रोतांचं संरक्षण, पाण्याच्या हालचालींचा अभ्यास आणि गुणवत्तेचं विश्लेषण अशा बाबींचे शिक्षण दिले जाते.

जलविज्ञानाशी संबंधित शासकीय व खासगी क्षेत्रात या शाखेतील अभियंत्यांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होते. हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना लाखोंच्या पॅकेजची नोकरी सहज मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe