Best Picnic Spot : देशातील काही राज्यांमध्ये मान्सूनची इंट्री झाली आहे आणि आता अनेक जण पिकनिकचा प्लॅन बनवत आहेत. दरम्यान, जर तुम्हालाही पावसाळ्यात पिकनिकला जायचं असेल पण तुमचा बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही अशा काही ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत चांगला कॉलिटी टाईम स्पेंड करू शकता.
खरंतर भारतात अशी असंख्य पर्यटन स्थळ आहेत जिथे पर्यटकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. दरम्यान आज आपण याच असंख्य पर्यटन स्थळांपैकी टॉप 10 पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेणार आहोत. महत्त्वाचे म्हणजे आज आपण ज्या ठिकाणांची माहिती पाहणार आहोत तिथे तुम्ही अगदी कमी पैशात फिरून येऊ शकता.

ही आहेत भारतातील टॉप 10 बजेट फ्रेंडली पिकनिक स्पॉट
वाराणसी : भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणजेच उत्तर प्रदेशातील हे ठिकाण हिंदू धर्मीयांसाठी फारच पवित्र ठिकाण समजले जाते. या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी येतात. तुम्हीही तुमच्या परिवारासमवेत पावसाळी काळात पिकनिकला जाणार असाल तर तुमच्यासाठी वाराणसीचा ऑप्शन बेस्ट राहणार आहे. गंगा आरती, गंगा घाट, काशी विश्वनाथ मंदिर आणि इतरही अनेक छोटी मोठी मंदिरे वाराणसी मधील महत्त्वाची आकर्षण आहेत. हे धार्मिक पर्यटनाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.
तवांग : भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये शेकडो पर्यटन स्थळे आहेत. अरुणाचल प्रदेश हे देखील भारताच्या ईशान्यकडील एक महत्त्वाचे राज्य आणि तवांग हे अरुणाचल प्रदेश मधील एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे. या ठिकाणी दरवर्षी पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. देश-विदेशातील असंख्य पर्यटक येथे पिकनिक साठी जातात.
या ठिकाणी तुम्ही तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत पिकनिकचा प्लॅन बनवू शकता.नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळांसाठी हे जगप्रसिद्ध आहे. येथील बौद्ध मठात अनेक जण येतात. तुम्ही जर येथे गेलात तर नुरानंग धबधबा, सेला तलाव आणि तवांग मठाला अवश्य भेट द्यायला हवी.
ऋषिकेश : देवभूमी उत्तराखंड येथील ऋषिकेश हे धार्मिक पर्यटनाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. उत्तराखंड राज्यातील देहरादून जवळ ऋषिकेश हे शहर वसलेले आहे. हिंदू सनातन धर्मातील हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. तुम्ही तुमच्या परिवारासमवेत या ठिकाणी नक्कीच भेट द्यायला हवी.
पुष्कर : राजस्थानातील पुष्कर हेदेखील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. उत्तर भारतातील हे ठिकाण पर्यटकांमध्ये नेहमीच लोकप्रिय राहिले आहे. हे ठिकाण ब्रह्मा मंदिर आणि उंट मेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. हे पर्यटन स्थळ बजेट फ्रेंडली असून या ठिकाणी तुम्ही कमी पैशांमध्ये ट्रिपचे आयोजन करू शकता.
हंपी : कर्नाटकातील हम्पी हे देखील एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे. हे ठिकाण प्राचीन मंदिरांसाठी आणि स्थापत्य कलेसाठी विशेष ओळखले जाते. या ठिकाणी तुम्हाला अनेक ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतील. महाराष्ट्रातील प्रवाशांना येथे कमी पैशात पोहोचता येते आणि हे एक बजेट फ्रेंडली पिकनिक स्पॉट आहे.
उटी : उटी हे तामिळनाडूमधील प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे. हे हिल स्टेशन पर्यटकांमध्ये फारच लोकप्रिय असून येथे दरवर्षी लाखो पर्यटक पिकनिक साठी गर्दी करतात. येथील तलाव, कॉफीमळे, चहाच्या बागा आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.
मॅमॅक्लॉडगंज : हे ठिकाण धर्मशाळेच्या अगदी जवळच आहे. निसर्गप्रेमींसाठी आणि ट्रेकर्स साठी हे ठिकाण परफेक्ट राहणार आहे. तुम्हालाही पिकनिकला जायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी कमी पैशात जाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता.
लॅन्सडाउन : हे ठिकाण देवभूमी उत्तराखंड राज्यात येते. हे हिल स्टेशन शांत वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथे पर्यटकांची विशेष गर्दी राहत नाही आणि वातावरण देखील फारच थंड राहते यामुळे तुम्ही येथे पिकनिकचा प्लॅन बनवू शकता.
कसोल : पावसाळ्यात तुम्हाला देशातील एखाद्या प्रसिद्ध हिल स्टेशनला जायचे असेल तर तुम्ही हिमाचल प्रदेशातील या पिकनिक स्पॉटला नक्कीच भेट देऊ शकता.
अमृतसर : पंजाब राज्यातील अमृतसर हे सुवर्ण मंदिरासाठी आणि जालियनवाला बाग या दोन ठिकाणांसाठी जगप्रसिद्ध आहे. अमृतसर हे एक बजेट फ्रेंडली पर्यटन स्थळ आहे.