कडू कारल्याने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा! 3 एकरात लागवड केली अन तब्बल 10 लाखांची कमाई झाली, वाचा ही यशोगाथा

Ajay Patil
Published:
Bhandara Farmer Success Story

Bhandara Farmer Success Story : राज्यात गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग राबवले जात आहेत. कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांनी देखील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. शासनाकडूनही शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जात आहेत. दरम्यान आता प्रयोगशील शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांवर विसंबून न राहता नगदी पिकांची आणि भाजीपाला वर्गीय पिकांची शेती सुरू केली आहे.

अल्पकालावधीत आणि कमी खर्चात उत्पादन मिळणाऱ्या पिकांची लागवड शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत आहे. बाजारात जे विकेल तेच पिकेल असा मंत्र शेतकऱ्यांनी आत्मसात केला आहे. याचा शेतकऱ्यांना आता फायदा होत आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यात असाच काहीसा प्रयोग पाहायला मिळाला आहे. जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मौजे खोलमारा येथील प्रगतिशील शेतकऱ्याने आपल्या तीन एकरात कारले या भाजीपाला पिकाची शेती करून लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी! परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांना कृषी भूषण पुरस्कार मिळणार? पहा

भाजीपाला शेतीतुन केवळ उदरनिर्वाह चालू शकतो मात्र लाखो रुपयांची कमाई होऊ शकत नाही, असा शेतकऱ्यांचा समज आहे. मात्र या शेतकऱ्याने कारल्याच्या पिकातून लाखो रुपयांची कमाई करत सर्वांनाच भाजीपाला शेती फायदेशीर असल्याचे पटवून दिले आहे. अमृत मदनकर असे या शेतकऱ्याचे नाव असून ते आत्तापर्यंत परिसरातील इतर शेतकऱ्याप्रमाणेच धान पिकाची लागवड करत होते. धान पिकाची शेती मात्र तुलनेने अधिक खर्चिक आणि मेहनतीची आहे.

शिवाय यासाठी अधिक पाणीही लागते. यामुळे त्यांनी धान पिकाला पर्याय पिकाची शोधाशोध सुरु केली. यासाठी कृषी विभागाचा त्यांनी सल्ला घेतला. कृषी विभागाने पारंपारिक पिकांना ऐवजी बागायती पीक लागवड करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यावर अंमल करत या शेतकऱ्याने आपल्या तीन एकरात कारल्याची शेती सुरू केली. आधुनिक पद्धतीने कारल्याची शेती त्यांनी केली असून तीन एकरात एका वर्षामध्ये दहा लाखांची कमाई त्यांना झाली आहे.

हे पण वाचा :- खुशखबर! शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झाली ‘इतकी’ वाढ; शासनाचा मोठा निर्णय, किती वाढणार पगार, पहा…

कारल्यासोबतच काकडी, वाल अन गाजर या पिकाची पण त्यांनी लागवड केली आहे. यातूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. निश्चितच विदर्भातील या शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे. शेतकऱ्यांनी जर काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल केला तर निश्चितच शेती व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते हेच या प्रयोगातून आज पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.

केवळ पारंपारिक पद्धतीने शेती केली तर शेतीमधून चांगली कमाई होऊ शकत नाही यासाठी आधुनिकतेची जोड शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. शिवाय पीक पद्धतीत अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. पारंपारिक पिकांची लागवड केली तर केवळ उदरनिर्वाह भागू शकतो मात्र जर फळबाग तसेच इतर बागायती पिकांची शेती सुरू केली तर लाखो रुपयांची कमाई होऊ शकते हेच अमृत मदनकर यांनी आपल्या प्रयोगातून दाखवून दिले आहे.

हे पण वाचा :- कौतुकास्पद! संकटात सापडलेल्या बळीराजासाठी पोलिसांचा अभिनव उपक्रम; खाकी वर्दीच्या ‘धाराशिव पॅटर्न’ची अख्या राज्यात चर्चा, उपक्रमाचे डिटेल्स पहा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe