Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
Bharti Airtel Share Price

500 टक्क्यांनी वाढला कंपनीचा प्रॉफिट, शेअर बाजारातील घसरणीच्या काळातही ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवतोय मालामाल!

Friday, February 7, 2025, 3:54 PM by Tejas B Shelar

Bharti Airtel Share Price : भारती एअरटेल कंपनीच्या स्टॉक बाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहेत. खरंतर आज शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मात्र या घसरणीच्या काळातही भारती एअरटेल चा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरतोय.

या स्टॉकमध्ये आज शुक्रवारी पाच टक्क्यांची वाढ दिसली आहे. महत्त्वाचे म्हणजे आगामी काळातही हा स्टॉक चांगली कामगिरी करताना दिसणार असे भाकीत वर्तवले जात आहे. कंपनीच्या नेट प्रॉफिट मध्ये 505 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Bharti Airtel Share Price
Bharti Airtel Share Price

डिसेंबर तिमाहीच्या काळात कंपनीचा नेट प्रॉफिट 14 हजार 781 कोटी रुपये इतका राहिला आहे. हेच कारण आहे की स्टॉक मार्केट विश्लेषक या स्टॉक साठी सकारात्मक आउटलूक देताना दिसत आहेत. दरम्यान आज आपण या स्टॉक साठी स्टॉक मार्केट विश्लेषकांकडून काय अंदाज दिला जातोय याबाबत माहिती पाहणार आहोत.

खरेतर, ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 दरम्यान या कंपनीचा महसूल 45129 कोटी रुपये इतका राहिला. म्हणजे कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर 19 टक्क्यांनी वाढ झाली.

कंपनीचा महसूल हा अपेक्षेपेक्षा जास्त राहिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) 245 रुपये राहिला आहे जो एका वर्षापूर्वी प्रति शेअर २०८ रुपये होता.

सध्या भारती एअरटेलच्या स्टॉकची कामगिरी कशी आहे

आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारती एअरटेलचे शेअर्स १६४९.९५ रुपयांच्या पातळीवर उघडले. दिवसभरात कंपनीच्या स्टॉकने 5.43 टक्क्यांहून अधिक वाढीसह 1708 रुपयांची पातळी गाठली होती.

कंपनीचे शेअर्स 1778.95 रुपयाच्या सार्वकालिक उच्चांकाच्या अगदी जवळ पोहोचले होते. दुसरीकडे, भारती एअरटेलची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1098 रुपये आहे.

स्टॉक मार्केट विश्लेषकांनी काय सांगितलं?

या कंपनीच्या स्टॉक्सबाबत तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. मॉर्गन स्टॅनलीने एअरटेलला इक्वल वेट असे म्हटले आहे. या स्टॉकसाठी 1650 रुपये एवढी टारगेट प्राईज ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, HSBC ने याला बाय रेटिंग दिली आहे.

यासाठी सदर ब्रोकरेज हाऊसकडून 1940 रुपये एवढी टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. गेल्या एका वर्षात एअरटेलच्या शेअरच्या किमतीत 47 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याच वेळी, या कालावधीत सेन्सेक्स केवळ 8 टक्के परतावा देऊ शकला आहे.

Categories स्पेशल Tags Bharti Airtel Share Price
Penny Stock:- दहा रुपयांपेक्षा स्वस्त, पण परतावा जबरदस्त! गुंतवणूकदारांसाठी ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी
Swiggy चे शेअर IPO प्राईसपेक्षा खाली, पण एक्सपर्ट म्हणताय स्टॉकच्या किमती 100 टक्क्यांनी वाढणार !
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress