Bharti Airtel Share Price : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उत्साह दिसतोय. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर भारतीय शेअर बाजारात तेजी आली आहे. मंगळवारी सुद्धा शेअर बाजारात चांगली रॅली दिसली आहे. मंगळवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टीमध्ये 300 अंकांची वाढ झाली होती.
बीएसईच्या 30 शेअरच्या सेन्सेक्समध्ये 1,397 गुणांनी वाढ झाली, तर निफ्टीला 378 गुणांचा नफा झाला. यावेळी, भारती एअरटेलचा स्टॉकसुद्धा फोकसमध्ये होता. यात चढउतार पाहायला मिळालेत मात्र तरीही स्टॉक मार्केट विश्लेषकांनी या स्टॉक वर विश्वास दाखवला आहे.
दरम्यान आज आपण स्टॉक मार्केट विश्लेषकांनी भारती एअरटेलच्या स्टॉकबाबत काय भूमिका मांडली आहे, बाजारातील तज्ञ सोनी पटनाईक यांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी पुढे काय करावे याबद्दल काय मत नोंदवले आहे याचाचं सविस्तर आढावा घेणार आहोत.
स्टॉकसाठीची टार्गेट प्राईस काय आहे ?
स्टॉक मार्केटमधील तज्ञ सांगतात की, भारती एअरटेलवरील सर्व शॉट्स फिरत्या सरासरीपेक्षा जास्त आहेत. या स्टॉकमध्ये 1613 रुपयांच्या पातळीवर जोरदार समर्थन आहे. आजही, याच पातळीवर हा स्टॉक होता पण हा स्टॉक रिवर्स होताना दिसत आहे.
मात्र अशा या परिस्थितीत सुद्धा तज्ञांकडून या स्टॉकसाठी बाय रेटिंग देण्यात आली आहे. म्हणजे या पातळीवर भारती एअरटेल खरेदी केला जाऊ शकतो. स्टॉक मार्केट विश्लेषकांनी या स्टॉक साठी 1700 ते 1720 रुपयांचे टार्गेट प्राईज निश्चित केले आहे आणि 1605 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे.
स्टॉकची सध्याची स्थिती
भारती एअरटेलचा स्टॉक काल चढ -उतारांसह व्यापार करताना दिसला. मंगळवारी, स्टॉक ट्रेडिंग सुमारे 1 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाली म्हणजे त्याची किंमत 1661 रुपयांच्या आसपास बंद झाली.
हा स्टॉक काल, सकाळी 1660 रुपयांच्या किंमतीवर खुला झाला. स्टॉकची प्रिवीयस क्लोजिंग 1652 रुपये होती. आज या स्टॉकचा उच्चाक 1668 रुपये अन त्याचवेळी निचाँक 1628 चा राहिला.
तिमाही निकाल कधी ?
भारती एअरटेल यांनी एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, त्याच्या संचालक मंडळाची बैठक उद्या शुक्रवारी म्हणजे 7 फेब्रुवारी, 2025 रोजी होईल यात कंपनीच्या तिमाही निकालाबाबत विचार होणार आहे. यामुळे या बैठकीत नेमके काय होणार याकडे साऱ्यांच्या नजरा राहणार आहेत.