Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
BHEL Share Price

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या (BHEL) शेअरमध्ये उसळी ! यामागचे कारण काय ?

Wednesday, January 29, 2025, 8:06 PM by Tejas B Shelar

BHEL Share Price : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. मंडळी या कंपनीने नुकताच आपला तिमाही निकाल जाहीर केला अन यात कंपनीच्या नफ्यात वाढ झाली. यानंतर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे ​​शेअर्स 4% पेक्षा जास्त वाढलेत.

खरं तर, कॉन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट अर्थात एकत्रित निव्वळ नफा हा एक्सपर्ट्सच्या अंदाजाला मागे सोडत दुप्पटीपेक्षा जास्त राहिला. या पॉवर इक्विपमेंट निर्मात्या कंपनीचा नफा ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत 135 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 60.3 कोटी रुपये इतका होता.

BHEL Share Price
BHEL Share Price

कंपनीचा नफा मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने या कंपनीच्या शेअर्समध्ये देखील आता मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या कंपनीचा नफा 121 कोटी रुपये राहील असा तज्ज्ञांचा अंदाज होता.

मात्र हा नफा थेट 135 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत मिळू लागले आहेत. परिणामी गुंतवणूकदार आगामी काळात आणखी मालामाल होतील अशी स्थिती आहे.

कंपनीच्या महसूल मध्ये देखील वाढ झाली आहे. 5,504 कोटी रुपयांच्या तुलनेत महसूल 32% वाढून 7,277 कोटी रुपये झाला आहे. याने देखील ब्लूमबर्गच्या 6792 कोटी रुपयांच्या अंदाजाला मागे टाकले आहे.

तसेच EBITDA 216 कोटींच्या तुलनेत 41% ने वाढून 304 कोटी रुपये झाला. तज्ञांनी EBITDA 302 कोटी रुपये राहिल असा अंदाज दिला होता. म्हणजे EBITDA सुद्धा चांगला वाढला आहे. तसेच मार्जिन 30 आधार अकांच्या वाढीने 3.9% वरून 4.2% झालाय.

मात्र तज्ञ लोकांनी मार्जिन 4.4% राहील असे म्हटले होते. महसुलातील ही वाढ त्याच्या दोन्ही विभागातील महसूल – उर्जा आणि उद्योगात 32% वाढीमुळे झाली. शेअर बाजारातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, BHEL ची EBITDA वाढ उच्च टॉपलाइन वाढ आणि 310.7 कोटी रुपयांच्या इन्व्हेंटरी रिव्हर्सलमुळे झाली आहे.

कंपनीच्या निव्वळ नफ्यातील वाढ उच्च महसूल आणि EBITDA वाढीमुळे झाली आहे. दरम्यान आज कोणती जानेवारी 2025 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात NSE निफ्टीवर दिवसभरात BHEL Ltd च्या शेअरची किंमत 4.63% वाढली.

सध्या हा स्टॉक 196.30 रुपये प्रति शेअरवर ट्रेड करतोय. बेंचमार्क निफ्टी 50 मधील 0.34% वाढीच्या तुलनेत सकाळी 9:39 वाजता तो 3.16% वाढून 193.54 रुपये प्रति शेअर वर व्यापार करत होता.

Categories स्पेशल Tags BHEL Share, BHEL Share News, BHEL Share Price, BHEL Share Price News, BHEL Share Price Update
शेअर मार्केटमधील आहे हा Magic शेअर! 50 हजाराचे झाले 1 कोटी
कंपनीच्या प्रॉफिटमध्ये मोठी घट, तरीही शेअरमध्ये 8% वाढ ! KPIT Tech च्या शेअर्समध्ये उसळीचे कारण नेमके काय?
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress