BHEL Share Price : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) या महारत्न कंपनीला सिंगरेनी कोलियरीज लिमिटेड कंपनीकडून 6700 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. हा प्रोजेक्ट तेलंगणामध्ये राहणार असून, 1×800 मेगावॅट क्षमतेच्या थर्मल पॉवर प्लांटच्या उभारणीसाठी हा करार करण्यात आला आहे.
यामुळे BHEL चे स्टॉक शेअर बाजारात पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत. यासाठी स्टॉक मार्केट विश्लेषकांनी पॉझिटिव्ह आऊट लुक दिला असून स्टॉक मार्केट विश्लेषक हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत म्हणजेच याला बाय रेटिंग देण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत आज आपण या स्टॉकसाठी स्टॉक मार्केट विश्लेषकांनी काय टार्गेट प्राईस दिले आहे आणि सध्या हा स्टॉक शेअर बाजारात कशी कामगिरी करतोय याचीच माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
48 महिन्यांत पूर्ण करावा लागणार प्रोजेक्ट
BHEL ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, ही ऑर्डर EPC (इंजिनिअरिंग, प्रोक्योरमेंट आणि कन्स्ट्रक्शन) अंतर्गत येते. यामध्ये बॉयलर, टर्बाइन, जनरेटर आणि त्यासंबंधित उपकरणांची निर्मिती आणि पुरवठा करण्याची जबाबदारी BHEL वर असेल. हा प्रकल्प कंपनीला पुढील 48 महिन्यांत पूर्ण करायचा आहे.
याआधी 6200 कोटींचा ऑर्डर मिळाली होती
याआधी BHEL ला दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, कोलकाता कडून 6200 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाली होती. तसेच 9 फेब्रुवारी रोजी अदानी एनर्जी कडून BF800 HVDC प्रोजेक्ट साठीही कंपनीला ऑर्डर प्राप्त झाली होती. यामुळे BHEL च्या ऑर्डर बुकमध्ये मोठी वाढ झाली आहे.
1.60 लाख कोटींच्या ऑर्डर बुकसह भक्कम स्थिती
31 डिसेंबर 2024 पर्यंत BHEL चे ऑर्डर बुक तब्बल 1,60,157 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यापैकी 1.21 लाख कोटी रुपयांचे ऑर्डर्स केवळ पॉवर सेक्टरमधून आले आहेत. तिसऱ्या तिमाहीत (Q3) कंपनीला एकूण 47,947 कोटी रुपयांचे नवीन ऑर्डर मिळाले असून, त्यापैकी 39,464 कोटी रुपयांचे ऑर्डर पॉवर सेक्टरमधून आले आहेत.
कमकुवत शेअर, पण ब्रोकरेज हाउसेसचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन
सध्या BHEL चा शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या जवळ आहे. जुलै 2024 मध्ये याने 335 रुपयांचा उच्चांक गाठला होता, पण तेथून 43% घसरून सध्या 193 रुपयांवर पोहोचला आहे. जानेवारी 2025 मध्ये याने 185 रुपयांचा 52-आठवड्यांचा लो टच केला होता.
तथापि, अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी या शेअरबाबत सकारात्मक मत दिले आहे. एंटीक ब्रोकिंगने यासाठी 300 रुपयांच टार्गेट प्राइस दिल आहे. Morgan Stanley ने 352 रुपयांचं टार्गेट दिल आहे अन CLSA ने फक्त 166 रुपयांचा टार्गेट देत सावधगिरी दाखवली आहे.
दीर्घकाळात मिळू शकतो अधिकचा परतावा
सरकारी पातळीवर ऊर्जा क्षेत्रावर भर देण्यात येत असून, त्यामुळे BHEL साठी पुढील काळात मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. नव्या ऑर्डर्समुळे कंपनीचा व्यवसाय आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन दृष्टीने या शेअरकडे पाहावे, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. तथापि गुंतवणुकीच्या आधी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.