दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतील टीम इंडिच्याच्या पराभवानंतर विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने कसोटी संघाच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला आहे.
याआधी कोहलीने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयामुळे त्याने वनडेचे कर्णधारपद गमावले. किमान कसोटी संघाच्या नेतृत्वपदी तरी आणखी काही वेळ तो संघाची धूरा सांभाळेल, असे वाटत होते.
पण अखेर त्याने अचानकपणे कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विराट कोहलीच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमध्ये अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.
ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे,विराट कोहलीने लिहिले की, “मी माझे काम प्रामाणिकपणे केले आणि कोणतीही कसर सोडली नाही, या पोस्टद्वारे बीसीसीआय, टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
३३ वर्षीय विराट कोहलीने २०१४ मध्ये कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत ९९ सामने खेळले असून ७९६२ धावा केल्या आहेत. यातील ६८ सामन्यांमध्ये विराटने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आणि या कालावधीत एकूण ५८६४ धावा केल्या.
— Virat Kohli (@imVkohli) January 15, 2022