मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीला, काय असेल कारण ?

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी भेट झाली आहे. राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत असताना आता मोठी अपडेट समोर आली आहे.

गेल्या काहीं दिवसांपासून महाविकास आघाडी विरूद्ध भाजपच्या संघर्षामध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे मोठ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यात मिनी विधानसभा निवडणुका म्हणजेच मोठ्या शहरांच्या महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य निवडणुका तोंडावर आहे.

त्यापार्श्वभुमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट महत्वाची मानली जात आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खास निमंत्रण दिले होते.

त्यानुसार फडणवीस यांनी ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकासआघाडी आणि भाजपमधील संघर्ष दिवसेंदिस टोकाला जात असताना भाजप आणि मनसे जवळ येतात का या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News