महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांसाठी मोठी बातमी ! 14 मे 2025 रोजी महत्वाचा जीआर निघाला

राज्यातील शिक्षकांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. येत्या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे तर दुसरीकडे राज्यातील शिक्षकांसाठी नुकताच एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Published on -

Maharashtra ZP School Teacher : जर तुम्हीही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शिक्षक म्हणून सेवा देत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या बदली संदर्भात आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या बदली संदर्भात नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यासंदर्भात 14 मे 2025 रोजी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक जीआर काढण्यात आला आहे ज्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या बदली संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे शासन निर्णय !

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, काल 14 मे 2025 रोजी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून जारी करण्यात आलेल्या जीआर मध्ये 18 जून 2014 च्या शासन निर्णयामधील काही महत्त्वाच्या बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामुळे सध्या ग्रामविकास विभागाच्या या जीआरची शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

या जीआरनुसार, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या गैरवर्तणूकीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाल्यास तक्रारी संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेऊन तक्रारीमधील गांभीर्य विचारात घेऊन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचे संबधित जिल्हा परिषद शिक्षकास त्या पदावर ठेवणे योग्य नाही, असे मत झाल्यास, त्याबाबतची कारणमिमांसा नमूद करून, संदर्भ क्र.2 येथील बदली अधिनियम, 2005 मधील कलम 4(4) (दोन) व 4(5) मधील तरतूदीनुसार विभागीय आयुक्त यांच्याकडे संबंधीत शिक्षकाची बदली प्रस्तावित करतील.

दरम्यान, अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर, त्यावरील उक्त नमूद कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी 30 दिवसांमध्ये पूर्ण करावी असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. तसेच, संबधित विभागीय आयुक्त, यांनी असा प्रस्ताव प्राप्त झाल्यास संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी नमूद केलेल्या कारणांची छाननी करून, अशा बदलीस 30 दिवसांच्या आत सहमती दर्शवावी असे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे.

पण मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी सादर केलेल्या प्रस्तावास विभागीय आयुक्तांची सहमती नसल्यास त्याबाबतची लेखी कारणे नमुद करणे आवश्यक राहील. विभागीय आयुक्तांनी अशा शिक्षकाची तक्रारीवरून बदली करण्यास सहमती दर्शविल्यानंतर, सदर शिक्षकाची ऑफलाईन पद्धतीने बदली संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी अशी सहमती प्राप्त झाल्यापासून 7 दिवसात तातडीने करावी, असे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या या शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे.

नवीन शैक्षणिक वर्षात शाळा कधी सुरू होणार?

दरवर्षीप्रमाणे यंदाही 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. पण शाळा 16 जूनलाच उघडतील अशी माहिती समोर येत आहे. महत्वाची बाब म्हणजे येत्या शैक्षणिक वर्षात अर्थातच शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये राज्यातील सर्व शाळाधील वेळापत्रकात सुद्धा बदल होणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार हा बदल केला जाईल अशी माहिती हाती येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe