बातमी कामाची ! ग्रामपंचायतमध्ये मुदतीत जन्माची नोंद केलेली नसेल तर जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी कुठे अर्ज करावा? तज्ञांनी दिली मोठी माहिती

Birth Certificate : जन्म दाखला अर्थातच जन्म प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. या कागदपत्राचा जवळपास सर्वच ठिकाणी उपयोग होतो. शासकीय कामांसाठी निमशासकीय कामांसाठी तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जन्म प्रमाणपत्र आवश्यक असते. अलीकडेच महाराष्ट्र राज्य सरकारने घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील जन्म प्रमाणपत्र लागते.

मात्र, अनेक जण दिलेल्या मुदतीत जन्माची नोंद करत नाहीत आणि यामुळे अशा व्यक्तींना जन्म दाखला काढताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आज आपण ज्या लोकांना मुदतीत जन्माची नोंद करता आलेली नाही अशा लोकांना जन्म दाखला काढण्यासाठी कुठे अर्ज करावा लागेल? याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरंतर अनेकांच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये जर मुदतीत म्हणजे एका महिन्याच्या आत जन्माची नोंद केलेली नसेल तर जन्म प्रमाणपत्र कसे काढावे असा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान याच संदर्भात जाणकार लोकांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

जर समजा तुम्ही तुमच्या घरात जन्मलेल्या बाळाची जन्माची नोंद दिलेल्या मुदतीत ग्रामपंचायत कार्यालयात केलेली नसेल तर जन्म दाखला कसा काढायचा? तज्ञ सांगतात की जन्माची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात एका महिन्याच्या आत म्हणजेच 30 दिवसांच्या आत होणे आवश्यक आहे.

मात्र जर काही कारणास्तव जन्माची नोंद वेळेत होऊ शकली नाही. जर जन्माची नोंद करण्यास एक वर्षापेक्षा जास्तीचा उशीर झाला असेल तर जन्माची नोंद घेण्यासाठी तहसील कार्यालयात माननीय तहसीलदार साहेब यांना अर्ज करावा लागतो.

अर्ज केल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाला जन्माची नोंद घेण्यास आदेश देत असतात.

यामुळे जर तुमच्याही बाबतीत असेच काहीसे झाले असेल तर तुम्हाला सुद्धा तहसील कार्यालयात जाऊन माननीय तहसीलदार साहेब यांच्या नावे अर्ज करून जन्म नोंद करणेबाबत विनंती करावी लागणार आहे. तसेच यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची देखील पूर्तता करावी लागणार आहे.

तहसीलदारांना अर्ज केल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब या अर्जावर पुढील प्रक्रिया पूर्ण करतील आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीला याबाबत सूचित केले जाईल आणि ग्रामपंचायत कार्यालयाला जन्म नोंद घेण्यासाठी आदेश दिले जातील.