BMI Index : अलीकडे सर्वजण आपल्या आरोग्याविषयी सतर्क झाले आहेत. विशेषता कोरोना काळापासून प्रत्येकाला आपल्या आरोग्याची चिंता आहे. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती अस आपण नेहमी म्हणत असतो.
त्यामुळे आपण सर्वजण आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी योग्य आहार घेतो. वेळेवर व्यायाम करतो अन वेळेवर झोपत असतो. मात्र असे असले तरी आपल्याकडे अनेक जण लठ्ठपणाचे शिकारी बनतात.

देशात डायबिटीज असणाऱ्यांचे प्रमाण फार अधिक आहे. देशात कुपोषित लोकांचे सुद्धा प्रमाण फार अधिक आहे. खरेतर, आपले आरोग्य हे आपल्या वजनावर अवलंबून असते.
आपली उंची आणि वजन याचा योग्य समतोल राखला गेला तर आरोग्य चांगले राहते. त्यामुळे आता आपण व्यक्तीच्या उंचीनुसार त्याचे वजन किती असायला हवं ? याबाबत माहिती पाहणार आहोत.
तज्ञ सांगतात की वजन गरजेपेक्षा कमी आणि गरजेपेक्षा जास्त असेल तर विविध आजारांचे धोके वाढत असतात. यामुळे आपले वजन हे नियंत्रणात असायला हवे.
दरम्यान मेडिकल सायन्स मध्ये आपल्या उंचीनुसार वजन किती हवं यासाठी एक विशेष सूत्र वापरले जात आहे. ज्याला बॉडी मास इंडेक्स या नावाने ओळखले जाते. BMI चे सूत्र आपल्या शरीराचे वजन उंचीच्या प्रमाणात आहे की नाही हे दाखवते.
याचा फॉर्मुला वजन (किलोमध्ये) / उंची (मीटर)² असा आहे. बीएमआय नेहमी 18.5 ते 24.9 दरम्यान असायला हवा. यापेक्षा जास्त असेल तर लठ्ठपणा असतो. तसेच कमी वजन असेल तर व्यक्ती कुपोषित किंवा अंडरवेट म्हणून ओळखली जाते.
तुमच्या उंचीनुसार योग्य वजन
5.9 फूट उंची – महिला 59-72, पुरुष 65-79
5.7 फूट उंची – महिला 55 – 67, पुरुष 60 – 73
5 फूट – स्त्रिया 40 – 50, पुरुष 43 – 53
5.3 फूट – स्त्रिया – 47 – 57, पुरुष 50 – 61
5.5 फूट – स्त्रिया – 51 – 62, पुरुष 55 – 68