दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! Board Exam बाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

Published on -

Board Exam Fee : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही दहावी – बारावीला असाल तर ही बातमी तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत वाचायला हवी. खरे तर यावर्षी पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलाय. त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे.

अशातच आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना एक मोठा धक्का दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंडळाकडून सलग चौथ्या वर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शुल्क वाढीचा दणका देण्यात आला आहे.

पूरस्थिती आणि महागाईच्या झळा सोसणाऱ्या पालकांसाठी नक्कीच हा निर्णय मोठा धक्कादायक मानला जात आहे. दिवाळीच्या आधीच झालेल्या या निर्णयामुळे पालक संतप्त असून मंडळावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयाचा ग्रामीण भागातील शेतकरी पालकांना सर्वाधिक फटका बसू शकतो.

शिक्षण मंडळाचा हा निर्णय पालकांच्या खिशाला कात्री लावणारा आहे. मंडळाकडून 2023 पासून सातत्याने शुल्क वाढ केली जात आहे. यामुळे ही एका प्रकारची परंपरा बनली आहे का? असा सवाल संतप्त पालकांकडून उपस्थित होतोय.

विशेष म्हणजे बोर्ड एक्झाम साठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क तर वसूल केले जाते याशिवाय प्रमाणपत्र, मार्कशीट लॅमिनेशन अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी स्वातंत्र शुल्क सुद्धा आकारले जात आहे.

यामुळे मंडळाच्या धोरणावर टीका होणे आणि प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. प्रशासकीय खर्च, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व परीक्षा संचालनाशी संबंधित खर्च वाढल्याचा युक्तिवाद करत मंडळाकडून परीक्षा शुल्क वाढवण्यात आले आहे.

दरम्यान आता आपण यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना किती परीक्षा शुल्क भरावे लागणार तसेच परीक्षा शुल्कासोबत कोणकोणते अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार ? याचा आढावा या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

किती शुल्क लागणार ? 

दहावीच्या विद्यार्थ्यांना – 520 रुपये 

बारावीच्या विद्यार्थ्यांना – 540 रुपये 

विद्यार्थ्यांना या गोष्टींसाठी द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क 

प्रशासकीय – 20

गुणपत्रिका – 20

प्रमाणपत्र -20

प्रात्यक्षिक परीक्षा (प्रति विषय) – 15

एमसीव्हीसी प्रात्यक्षिक परीक्षा (प्रति विषय) – 30

माहिती तंत्रज्ञान विषय शुल्क (प्रति विषय) – 200

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe