Bonus Share 2025 : गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांनी आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही कंपन्यांनी बोनस शेअर देण्याची देखील घोषणा केली आहे. यामुळे सध्या शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये काही स्टॉक्स संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
अशातच आता शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या RedTape Ltd. या कंपनीने देखील आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. रेडटॅप लिमिटेडने नुकताच बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी 1 स्टॉकवर 3 बोनस शेअर देणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या कंपनीने याआधी बोनस शेअर दिलेले नाहीत म्हणजेच ही कंपनीची पहिलीच वेळ आहे. महत्त्वाचे म्हणजे कंपनीने यासाठी रेकॉर्ड डेट देखील निश्चित केली आहे आणि ही रेकॉर्ड डेट या चालू आठवड्यातच येणार आहे.
दरम्यान कंपनीच्या या घोषणेनंतर आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीच्या शेअर्सची किंमत सात टक्क्यांनी वाढली असून सध्या हा स्टॉक 728.75 रुपयांवर ट्रेड करतोय. काल शनिवारी या स्टॉक ची किंमत 728.75 रुपयांवर क्लोज झाली.
आता आपण या कंपनीने बोनस शेअर साठी रेकॉर्ड डेट काय ठरवली आहे? या कंपनीची गेल्या काही वर्षांमधील शेअर बाजारांमधील कामगिरी कशी आहे? याबाबतचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
कधी आहे रेकॉर्ड डेट?
RedTape कंपनी 1 स्टॉकवर 3 शेअर बोनस देत आहे. 4 फेब्रुवारी 2025 रोजी या बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेट निश्चित केली गेली आहे. म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराला बोनस शेअर्सचा फायदा घ्यावा लागला तर उद्या त्याला शेअर्स खरेदी करावी लागेल.
महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीने एका महिन्यापूर्वीच आपल्या शेअर होल्डर्स ला लाभांश म्हणजेच डिविडेंट दिला होता. कंपनीने एका स्टॉक वर दोन रुपयांचा लाभांश देऊन गुंतवणूकदारांना मोठी भेट दिली होती. 3 जानेवारी 2025 ला कंपनीने आपल्या शेअर होल्डर्स ला डिव्हीडंटचा लाभ दिला होता. दरम्यान आता कंपनी बोनस शेअरची भेट देणार आहे.
RedTape ची कामगिरी कशी आहे?
गेल्या काही महिन्यांत रेडटॅप लिमिटेडची कामगिरी स्टॉक मार्केटमध्ये चांगली राहिलेली नाही. शनिवारी कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 8 टक्के वाढ झाली. पण यानंतरही, कंपनीच्या शेअर्सची किंमत एका महिन्यात 17 टक्के घसरली आहे. त्याच वेळी, 3 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना 24 टक्के तोटा सहन करावा लागला आहे.
मात्र कंपनीचे शेअर्स 1 वर्षात 11 टक्के वाढले आहेत. या कालावधीत, सेन्सेक्समध्ये सुद्धा 8.18 टक्के वाढ झाली आहे. तसेच कंपनीचा 52 वीक हाई 981.80 रुपये अन 52 वीक लो लेवल 537.05 रुपये इतकी राहिली आहे. या कंपनीचे मार्केट कैप 10071.46 करोड़ रुपये इतके आहे.