1 रुपया किंमत असणारा ‘हा’ स्टॉक खरेदीसाठी गुंतवणूकदारांची गर्दी ! कंपनी देणार 1:1 बोनस शेअर, रेकॉर्ड डेट बाबत काय अपडेट?

भारतीय शेअर बाजारात लिस्टेड कंपन्या सध्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत. तिमाही निकाल जाहीर करण्यासोबतच कंपन्यांकडून बोनस शेअरची आणि डीव्हीडेंड देण्याची सुद्धा घोषणा होत आहे. यामुळे सध्या मार्केटात काही स्टॉक फोकसमध्ये आहेत. दरम्यान, बोनस शेअर देणाऱ्या कंपनीमध्ये अनेकजण गुंतवणूक करण्यास इच्छुक असतात. जर आपलाही तसाच काहीसा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केबीसी ग्लोबल या छोट्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी एकावर एक फ्री बोनस शेअर देणार असून यामुळे ही कंपनी सध्या फोकस मध्ये आली आहे.

Tejas B Shelar
Updated:

Bonus Share 2025 : शेअर बाजारात लिस्ट असणाऱ्या कंपन्यांकडून आता आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. सोबतच काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची आणि डिव्हीडंट देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. यामुळे शेअर बाजारात मंदीचे सावट असतानाही काही कंपन्यांचे स्टॉक फोकस मध्ये आहेत.

शेअर बाजारातील मंदीमुळे गेल्या काही दिवसांच्या काळात गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता असून अशाच परिस्थितीत शेअर बाजारातून एक मोठे अपडेट समोर येत आहे.

जे लोक बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छितात त्यांच्यासाठी ही अपडेट कामाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केबीसी ग्लोबल ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देणार आहे.

यामुळे काल 18 फेब्रुवारी 2025 रोजी या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये राहिलेत. दरम्यान आज आपण या कंपनीच्या स्टॉकची सध्याची शेअर बाजारातील कामगिरी आणि या कंपनीने बोनस शेअर साठी रेकॉर्ड काय ठरवली आहे याचीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट काय आहे ?

नाशिकस्थित बांधकाम आणि रिअल इस्टेट कंपनी केबीसी ग्लोबलच्या संचालक मंडळाने 15 फेब्रुवारीला बोनस शेअरला मान्यता दिली. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एक शेअरवर एक फ्री बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे.

1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यास नुकतीच कंपनीने मान्यता दिली असून यासाठीची रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांनी जाहीर केली जाईल अशी शक्यता आहे. खरे तर गुंतवणूकदारांकडून बोनस शेअर साठी ची रेकॉर्ड डेट काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

मात्र अजून या कंपनीने यासाठीची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. कंपनी प्रत्येक स्टॉकसाठी एक इक्विटी शेअर जारी करणार आहे पण याची रेकॉर्ड डेट काय असेल हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

31 मार्च 2024 रोजी कंपनीच्या परमिसीबल राखीव रकमेतून बोनस इक्विटी शेअर्स जारी केले जातील. बोनस जारी करण्यासाठी एकूण 261.43 कोटी रुपये वापरले जातील. दरम्यान आता आपण या कंपनीची शेअर बाजारातील सध्याची परिस्थिती कशी आहे ? याचा एक आढावा घेऊयात.

केबीसी ग्लोबलच्या शेअरची स्थिती कशी आहे?

बोनस शेअर जारी केल्याची घोषणा झाल्यानंतर या पेनी स्टॉकमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी हा स्टॉक दोन टक्क्यांनी वाढला होता आणि काल मंगळवारी 18 फेब्रुवारी 2025 रोजी या स्टॉकच्या किमती पाच टक्क्यांनी वाढल्यात.

काल, हा स्टॉक पाच टक्क्यांनी वाढून 1.18 वर पोहोचला. बोनस शेअरची घोषणा केल्यानंतर या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आहेत. पण गेल्या काही वर्षांमधील या कंपनीच्या स्टॉकची शेअर बाजारातील परिस्थिती उत्साहवर्धक राहिलेली नाही.

एका वर्षातया स्टॉकमध्ये जवळपास 50% घसरण झाली आहे. 2025 मध्ये आतापर्यंत या पेनी स्टॉकमध्ये 35% घट झाली आहे. तसेच कंपनीचे शेअर्स पाच वर्षांत 92% आणि एका महिन्यात 25% ने घसरले आहेत.

पाच वर्षांपूर्वी या शेअरची किंमत 17 रुपये होती. सध्या हा स्टॉक 1.18 वर ट्रेड करतोय. दरम्यान आता कंपनीने बोनस शेअरची घोषणा केली असल्याने आगामी काळात या कंपनीच्या स्टॉकची स्थिती कशी राहणार हे पाहणे उत्सुकतेचे राहील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe