Bonus Share 2025 : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे, खरे तर सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. सोबतच काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा करत आहेत, तर काही कंपन्या डिविडेंड देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत.
शिवाय काही कंपन्यांच्या माध्यमातून आपले स्टॉक स्प्लिट केले जात आहेत. यामुळे सध्या शेअर बाजारात काही कंपन्यांचे स्टॉक फोकस मध्ये आहेत.

दरम्यान, बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे, ती म्हणजे टेक्सटाईल प्रॉडक्ट्स सेगमेंटची कंपनी जिंदल वर्ल्डवाइडने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याची मोठी घोषणा केली आहे.
कंपनीच्या या घोषणानंतर सध्या हा स्टॉक फोकसमध्ये आला आहे. विशेष बाब अशी की, यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट सुद्धा निश्चित केली आहे. अशा परिस्थितीत आता आपण कंपनीच्या या घोषणेबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.
कंपनी किती बोनस शेअर देणार ?
टेक्स्टाईल प्रॉडक्ट सेगमेंटची कंपनी जिंदल वर्ल्डवाइल्डने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार कंपनीकडून आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर चार बोनस शेअर दिले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे यासाठीची रेकॉर्ड डेट ही या महिन्यातच आहे.
कंपनीने बोनस शेअर्ससाठी 28 फेब्रुवारी 2025 ही रेकॉर्ड डेट सेट केली आहे. खरे तर कंपनीने बोनस शेअर देण्याची घोषणा आधीच केली होती मात्र आता कंपनीकडून यासाठीची रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.
यामुळे या कंपनीच्या स्टॉकच्या किमतीवर आगामी काळात परिणाम होण्याची शक्यता आहे. या कंपनीच्या स्टॉकबाबत बोलायचं झालं तर काल 21 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थात शुक्रवारी हा स्टॉक थोडासा घसरला होता.
21 फेब्रुवारीला हा स्टॉक घसरणीसह 357 रुपयाच्या खाली आला. सध्या हा स्टॉक 357 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय, पण हा स्टॉक वार्षिक निचांकी स्तरापेक्षा 30 टक्के वर आहे आणि उच्च स्तरापेक्षा जवळपास 25% खाली आहे.
दरम्यान, आता कंपनीकडून बोनस शेअरची घोषणा करण्यात आली असल्याने हा स्टॉक सध्या फोकस मध्ये आला आहे आणि कंपनीच्या या घोषणेची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.