Share Market मधील गुंतवणूकदारांसाठीमोठी बातमी ! ‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना देणार 5 बोनस शेअर्स

बिगर बँकिंग फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) गॅमको लिमिटेडकडून काल 21 फेब्रुवारी 2025 रोजी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी 5 बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे आणि यामुळे हा स्टॉक सध्या फोकस मध्ये आला आहे.

Tejas B Shelar
Published:

Bonus Share 2025 : बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गॅमको लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली आहे. याचा परिणाम म्हणून हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला असून काल, 21 फेब्रुवारी 2025 रोजी याच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

बिगर बँकिंग फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) गॅमको लिमिटेडचे स्टॉक 21 फेब्रुवारीला 10 टक्क्यांनी वाढलेत आणि हा स्टॉक 90.97 रुपयांवर पोहचला, मात्र ट्रेडिंग सेशन संपेपर्यंत हा स्टॉक 84.62 पर्यंत खाली आला. हा स्टॉक काल 84.62 वर क्लोज झाला आहे.

खरे तर सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांकडून आपले तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. तसेच कंपन्या बोनस शेअरची आणि डिव्हीडंट देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. यातच आता गॅमको लिमिटेडच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणूकदारांसाठी 5:4 या गुणोत्तरात बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे.

अर्थातच आता कंपनीकडून प्रत्येक चार शेअर्स मागे पाच बोनस शेअर दिले जाणार आहेत. तथापि बोनस शेअर साठी कंपनीकडून अजून रेकॉर्ड डेट फायनल करण्यात आलेली नाही. पण लवकरच कंपनी यासाठी रेकॉर्ड डेट ठरवणार आहे.

दरम्यान बोनस शेअर साठी कंपनीची रेकॉर्ड फायनल झालेली नसली तरी देखील हा स्टॉक फोकस मध्ये असून काल या स्टॉकमध्ये मोठी तेजी दिसून आली. दरम्यान आता आपण गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केलेल्या या कंपनीची गेल्या काही वर्षांमधील शेअर बाजारातील कामगिरी कशी राहिली आहे याचा एक आढावा घेणार आहोत.

शेअर्सने 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना किती परतावा दिलाय?

गॅम्को लिमिटेडचे शेअर्स लॉंग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरले आहेत. गेल्या 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत या कंपनीचे शेअर्स हे जवळपास 2700 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. स्टॉक एक्सचेंजवर उपलब्ध माहितीनुसार या कंपनीच्या शेअर्सची किंमत ऑगस्ट 2020 रोजी 3 रुपयांच्या रेंजमध्ये होती.

मात्र हा स्टॉक काल 90.97 रुपयांवर पोहोचला. तसेच गेल्या 3 वर्षात या शेअर्समध्ये 1300 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. म्हणजेच गेल्या काही वर्षांमध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 148 रुपये आणि 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 41.70 रुपये राहिली आहे. दरम्यान आता कंपनीकडून गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा करण्यात आली आहे. म्हणून हा स्टॉक सध्या फोकस मध्ये असून आगामी काळात याची कामगिरी कशी राहते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe