Share Market मधील गुंतवणूकदारांची चांदी होणार! ‘ही’ कंपनी एका शेअरवर देणार 5 फ्री बोनस शेअर, रेकॉर्ड डेट पहा….

गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची मोठी घोषणा केली असून यामुळे या कंपनीचे स्टॉक शेअर बाजारात फोकस मध्ये आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीने एका शेअरवर पाच फ्री बोनस शेअर देण्याची मोठी घोषणा केलेली आहे. यासाठी 18 फेब्रुवारी 2025 ही रेकॉर्ड डेट सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. अर्थातच या दिवशी ज्या शेअर होल्डर्सचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुक मध्ये असेल त्या सर्व शेअर होल्डर्सला या बोनस शेअरचा लाभ मिळणार आहे.

Tejas B Shelar
Published:

Bonus Share 2025 : बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. बोनस शेअर्स देणाऱ्या कंपनीमध्ये ज्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

गुजरात टूलरूम लिमिटेड या छोट्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी फ्री बोनस शेअरची घोषणा केली आहे. ही कंपनी एका शेअरवर 5 फ्री बोनस शेअर देणार आहे.

यामुळे आज या कंपनीचा स्टॉक फोकस मध्ये आहे. म्हणूनचं गुंतवणूकदारांमध्ये सध्या या कंपनीची मोठी चर्चा सुरु आहे. दरम्यान, आज आपण या कंपनीच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीची थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.

5 वर्षातील शेअर बाजारातील कामगिरी

गुजरात टूलरूम लिमिटेड या छोट्याशा कंपनीची गेल्या पाच वर्षांची कामगिरी उत्साहवर्धक राहिली आहे. गेल्या पाच वर्षात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 3121% परतावा दिला आहे.

27 नोव्हेंबर 2020 रोजी या कंपनीचा शेअर 38 पैशांवर होता मात्र, काल 17 फेब्रुवारी 2025 रोजी या कंपनीचा स्टॉक 12.24 रुपयांवर क्लोज झालाय. तसेच, गेल्या 4 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 2125 टक्क्यांची वाढ झाली आहे.

या कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 45.95 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 10.18 रुपये आहे. दरम्यान आता या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली आहे.

5:1 या प्रमाणात ही कंपनी बोनस शेअर देणार आहे म्हणजेच एका शेअर साठी पाच बोनस शेअर मिळणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या बोनस शेअर साठी आज अर्थातच 18 फेब्रुवारी 2025 ही रेकॉर्ड डेट आहे.

2025 मध्ये कंपनीच्या स्टॉकची कामगिरी कशी आहे

गत पाच वर्षात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला असला तरी देखील 2025 मधील आत्तापर्यंतची स्टॉकची कामगिरी फारशी उत्साहवर्धक राहिलेली नाही. या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये आतापर्यंत गुजरात टूलरूमच्या शेअर्समध्ये जवळपास 29 टक्क्यांची घसरण झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे.

या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या कंपनीचा स्टॉक 17.22 रुपयांवर ट्रेड करत होता मात्र आता या कंपनीचा स्टॉक 12.24 रुपयांवर ट्रेड करतोय. आता या कंपनीने बोनस शेअरची घोषणा केली असेल आणि आज एक्स-बोनस शेअर्स ट्रेड करणार असल्याने या कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe