गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ कंपनी 1 शेअरवर 5 शेअर्स फ्री देणार, रेकॉर्ड डेट नोट करा

गुजरात टूलरूमचे शेअर्स 18 फेब्रुवारी 2025 रोजी बोनस शेअर्सच्या रेकॉर्ड डेटवर ट्रेड करणार आहेत. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांकडे त्या तारखेला कंपनीचे शेअर्स असतील, त्यांनाच बोनसचा फायदा मिळेल.

Tejas B Shelar
Published:

Bonus Share 2025 : शेअर बाजारात लहान कंपन्यांच्या हालचालींकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असते. अशातच, गुजरात टूलरूम लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनी आपल्या शेअरहोल्डर्सला 5:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देणार आहे. म्हणजेच, प्रत्येक 1 शेअरसाठी गुंतवणूकदारांना 5 बोनस शेअर्स मिळणार आहेत.

बोनस शेअर्ससाठी महत्त्वाची तारीख

गुजरात टूलरूमचे शेअर्स 18 फेब्रुवारी 2025 रोजी बोनस शेअर्सच्या रेकॉर्ड डेटवर ट्रेड करणार आहेत. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांकडे त्या तारखेला कंपनीचे शेअर्स असतील, त्यांनाच बोनसचा फायदा मिळेल. सोमवारी कंपनीच्या शेअरची किंमत 12.24 रुपये होती.

गुजरात टूलरूमचे शेअर्सच्या 5 वर्षांची कामगिरी

गुजरात टूलरूमच्या शेअर्सने मागील काही वर्षांत गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. 27 नोव्हेंबर 2020 रोजी कंपनीचा शेअर फक्त 38 पैशांवर ट्रेड करत होता.

आता 17 फेब्रुवारी 2025 रोजी तो 12.24 रुपये वर पोहोचला आहे. याचा अर्थ कंपनीच्या शेअर्समध्ये 3121% वाढ झाली आहे. शिवाय मागील 4 वर्षांत 2125% वाढ झाली आहे. मात्र, मागील एका वर्षात मात्र 29% घसरण झाली आहे.

52 आठवड्यांतील उच्चांक आणि नीचांक

गुजरात टूलरूमच्या शेअर्सने मागील वर्षभरात मोठे चढ-उतार पाहिले आहेत. या शेअर्सचा मागील 52 आठवड्यांतील उच्चांक 45.95 रुपये अन मागील 52 आठवड्यांतील नीचांक 10.18 रुपये एवढा आहे.

कंपनीने डिव्हिडेंड सुद्धा दिलाय

गुजरात टूलरूमने याआधी मार्च 2023 मध्ये स्टॉक स्प्लिट केला होता. कंपनीने 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे 1 शेअर स्प्लिट करून 1 रुपयाच्या फेस व्हॅल्यूचे 10 शेअर्स दिले होते. एप्रिल 2024 मध्ये कंपनीने प्रति शेअर 1 रुपया अंतरिम लाभांश सुद्धा दिला होता.

कंपनीचे मार्केट कॅप आणि चालू वर्षातील परफॉर्मन्स

गुजरात टूलरूमचे मार्केट कॅप सध्या 284 कोटी रुपये आहे. मात्र, 2025 मध्ये आतापर्यंत शेअर्समध्ये 29% घसरण झाली आहे. 1 जानेवारी 2025 रोजी कंपनीचा शेअर 17.22 रुपये होता. 17 फेब्रुवारी 2025 रोजी तो 12.24 रुपये पर्यंत खाली आलाय.

गुंतवणूकदारांसाठी संधी की धोका?

गुजरात टूलरूमच्या शेअर्सनी भूतकाळात मोठा परतावा दिला असला, तरी सध्याची घसरण पाहता गुंतवणूकदारांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. कंपनीच्या बोनस शेअर्सनंतर शेअरची किंमत काही काळ दडपणाखाली राहू शकते. त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांनी फंडामेंटल्स आणि भविष्यातील ग्रोथचे विश्लेषण करूनच गुंतवणूक करावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe