पुढील आठवड्यात शेअर मार्केट मधील ‘या’ 5 कंपन्या बोनस शेअर्स आणि लाभांश वितरित करणार !

Published on -

Bonus Share And Dividend : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी पुढील आठवड्यात कमाईची सुवर्ण संधी घेऊन येत आहे. खरे तर मार्केटमधील गुंतवणूकदार नेहमीच बोनस शेअर्स तसेच लाभांश देणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष ठेवून असतात.

अनेक जण अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्याची इच्छा ठेवतात. दरम्यान जर तुमचाही बोनस शेअर्स आणि लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. आज आपण पुढील आठवड्यात बोनस शेअर्स आणि लाभांश वितरित करणाऱ्या कंपन्यांबाबत माहिती पाहणार आहोत. 

या कंपन्या देणार बोनस शेअर्स आणि लाभांश 

Authum Investment : या यादीत पहिली कंपनी आहे ऑथम इन्व्हेस्टमेंट. ही कंपनी एक नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनी असून या एनबीएफसी कडून आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर चार मोफत शहर दिले जाणार आहेत. यासाठीची रेकॉर्ड तारीख पुढील आठवड्यातच येत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस इशू साठी 13 जानेवारी 2026 ही तारीख फायनल केली आहे.

Best Agrolife : एग्रीकल्चर सेक्टरमधील ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना डबल बोनस देणार आहे. ही कंपनी बोनस शेअर्स तसेच स्टॉक स्प्लिटची भेट देईल. कंपनीने 1:2 बोनस जाहीर केला आहे. तसेच या कंपनीचे शेअर्स 1:10 च्या प्रमाणात विभाजित होणार आहेत. यासाठी कंपनीने 16 जानेवारी 2026 ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.

ताल टेक : या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वितरित करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार या कंपनीच्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर 35 रुपयांचा लाभांश मिळणार आहे. संचालक मंडळाने यासाठी 16 जानेवारी 2026 ही तारीख फायनल केली आहे. 

Jaro Institute : ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वितरित करणार असून यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने 16 जानेवारी 2026 ही तारीख रेकॉर्ड तारीख म्हणून फायनल केली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर दोन रुपयांचा लाभांश देणार आहे. 

TCS : ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना Dividend देणार आहे. यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने 17 जानेवारी रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. पण किती रुपयांचा लाभांश मिळणार? हे 12 जानेवारी रोजी समजणार आहे. म्हणून या बैठकीकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष राहील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News