Bonus Share : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात लिस्ट असणाऱ्या कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. तसंच काही कंपन्या बोनस शेअरची आणि डिव्हिडेंड देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. दरम्यान जर तुम्हीही बोनस शेअर मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी शेअर बाजारातून एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.
गॅमको लिमिटेड ही एक छोटी कंपनी असून या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्ससाठी नुकतेच बोनस शेअरची मोठी भेट देण्याची तयारी दाखवली आहे. नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी गैमको लिमिटेडने घोषित केले आहे की, त्याच्या संचालक मंडळाने 5: 4 गुणोत्तरात बोनस देण्यास मंजूरी दिली आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक 4 शेअर्सवर आपल्या गुंतवणूकदारांना 5 बोनस शेअर्स देईल.

मात्र कंपनीने अद्याप बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही. मात्र कंपनीच्या या घोषणेनंतर हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे. गेल्या एका महिन्यापासून या स्टॉकचा परफॉर्मन्स काहीसा खास राहिलेला नाही मात्र आता या घोषणेनंतर पुन्हा एकदा या कंपनीचे स्टॉक शेअर बाजारात तेजीत आलेत.
गुरुवारी 20 फेब्रुवारी 2025 रोजी बीएसईवर या स्टॉक मध्ये तेजी दिसून आली, काल एकाच दिवशी हा स्टॉक 6 % वाढला. सध्या गॅमको लिमिटेडचे शेअर्स 80.90 रुपयांवर आहेत.
शेअर बाजारातील गेल्या 5 वर्षांमधील कामगिरी
गॅमको लिमिटेडचे शेअर्स 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 2524 टक्क्यांनी वाढले आहेत. शेअर बाजारातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 2020 मध्ये या स्टॉकची किंमत फक्त तीन रुपयांच्या रेंजमध्ये होती.
10 ऑगस्ट 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.05 रुपयांवर ट्रेड करत होते मात्र आता 20 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीचे शेअर्स 80.90 रुपयांवर बंद झालेत. म्हणजे गेल्या पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना चांगला जबरदस्त परतावा दिला आहे.
गेल्या तीन वर्षांमध्ये या कंपनीचे शेअर्स 1158 टक्क्यांनी वधारले आहेत. तसेच, गेल्या एका वर्षात हे शेअर्स 54 % वाढले आहेत. 20 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 51.80 रुपये होते, काल, 20 फेब्रुवारी 2025 रोजी कंपनीचे शेअर्स 80.90 रुपयांवर बंद झाले.
शिवाय गेल्या 6 महिन्यांत, कंपनीचे शेअर्स 11 %पेक्षा जास्त वाढले आहेत. मात्र, यावर्षी आतापर्यंत म्हणजेच एक जानेवारी 2025 पासून ते आत्तापर्यंत गॅमको इंडियाचे शेअर्स 39 %पेक्षा जास्त घसरले आहेत. गेल्या 5 दिवसात कंपनीच्या शेअर्सने 12% नकारात्मक परतावा दिला आहे म्हणजेच हा स्टॉक 12 टक्क्यांनी घसरला आहे.
कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्याची उच्च पातळी 148 रुपये आहे 52 आठवड्याची निम्न पातळी 41.70 रुपये आहे. पण, कंपनीचे एकूण मार्केट कॅप हे 194 कोटी रुपयांच्या वर गेले आहे. दरम्यान आता कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली असल्याने हा स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आला असून आगामी काळात याची कामगिरी कशी राहते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.