Bonus Share News : बोनस शेअर मध्ये गुंतवणूक करणाऱ्या शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सध्या शेअर बाजारातील कंपन्यांकडून आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअरची आणि डिविडेंड देण्याची घोषणा केली जात आहे.
यात प्रधान लिमिटेड कंपनीने देखील आपल्या शेअरहोल्डर्ससाठी बोनस शेअरची घोषणा केली आहे. ही कंपनी 1 शेअर वर 2 बोनस शेअर देणार आहे. यामुळे सध्या या कंपनीचे स्टॉक सध्या फोकस मध्ये आहेत. 24 फेब्रुवारी 2025 रोजी या कंपनीच्या स्टॉक मध्ये पाच टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले अन हा स्टॉक 17 रुपयांवर पोहोचला.

आता आपण प्रधान लिमिटेड कंपनीने जाहीर केलेल्या बोनस शेअरची रेकॉर्ड डेट आणि या स्टॉकची सध्याची शेअर बाजारातील स्थिती नेमकी कशी आहे याबाबत माहिती पाहणार आहोत.
1 शेअरवर 2 फ्री बोनस शेअर मिळणार!
प्रधान लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर दोन फ्री बोनस शेअर देण्याची मोठी घोषणा केली आहे आणि यासाठीची रेकॉर्ड डेट सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. एवढेच नाही तर कंपनी आपले स्टॉक स्प्लिट करणार आहे.
1:10 या गुणोत्तरात ही कंपनी स्टॉक स्प्लिट करणार आहे. तसेच 2:1 या गुणोत्तरात कंपनीकडून बोनस शेअर दिले जाणार आहेत. याचा किरकोळ गुंतवणूकदारांना थेट फायदा होणार आहे. परिणामी सध्या या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आहेत आणि याची खरेदी वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्टॉक स्प्लिट करण्यासाठी आणि बोनस शेअर्ससाठी कंपनीने 7 मार्च 2025 ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. अर्थात या तारखेपर्यंत कंपनीच्या रेकॉर्ड बुक मध्ये ज्या शेअर होल्डर्स चे नाव राहणार आहे त्यांनाच या स्टॉक स्प्लिटचा आणि बोनस शेअरचा लाभ दिला जाणार आहे.
कंपनीची शेअर मार्केट मधील स्थिती
स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरची घोषणा केल्यानंतर या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आलेत. 24 फेब्रुवारी 2025 रोजी या कंपनीचे स्टॉक 5 टक्क्यांनी वाढलेत आणि सध्या या कंपनीचा स्टॉक 17 रुपयांवर व्यवहार करतोय.
स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरसाठी 7 मार्च ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आली असल्याने पुढील काही दिवस हा स्टॉक फोकसमध्येच राहणार आहेत.