Bonus Share News : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. खरंतर शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांनी आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. तिमाही निकाल जाहीर करतानाच काही कंपन्यांनी बोनस शेअर देण्याची सुद्धा घोषणा या ठिकाणी केलेली आहे.
अशीच घोषणा ग्रीनलॅम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने सुद्धा केली असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान आज आपण या कंपनीने बोनस शेअर बाबत नेमकी काय घोषणा केली आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ग्रीनलॅम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने काय म्हटलंय ?
ग्रीनलॅम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी ही शेअर बाजारात सूचीबद्ध आहे. ही कंपनी दहा वर्षांपूर्वी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आली. दरम्यान कंपनीकडून नुकताच आपल्या शेअर बाजारातील लिस्टिंगचा लिस्टिंगचा दहावा वर्धापनदिन साजरा करण्यात आला असून यानिमित्ताने कंपनीकडून एक मोठी घोषणा देखील करण्यात आली आहे.
कंपनीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. ग्रीनलॅम इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाने 1:1 गुणोत्तरात बोनस शेअरला मंजुरी दिली आहे.
म्हणजेच कंपनी विक्रमी तारखेपर्यंत गुंतवणूकदारांकडे असलेल्या प्रत्येक शेअरसाठी एक फ्री बोनस शेअर जारी करणार आहे. मात्र, कंपनीने बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट अद्याप निश्चित केलेली नाही.
पण लवकरच बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट जाहीर होण्याची शक्यता आहे. खरंतर या कंपनीकडून पहिल्यांदाच बोनस शेअरची घोषणा करण्यात आली आहे. ही कंपनी पहिल्यांदाच बोनस शेअर देणार असल्याने या कंपनीचा स्टॉक शेअर बाजारात अचानक फोकस मध्ये सुद्धा आला आहे.
मात्र या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला याआधी लाभांश दिला आहे आणि स्टॉक स्प्लिट देखील केले आहेत. मंडळी, कंपन्या त्यांच्या मुक्त शेअर्सचे चलनीकरण करण्यासाठी, प्रति शेअर उत्पन्न (ईपीएस) आणि पेड-अप भांडवल वाढविण्यासाठी तसेच राखीव रक्कम कमी करण्यासाठी बोनस शेअर्स जारी करतात.
हे शेअर्स फ्री मध्ये गुंतवणूकदारांना दिले जातात आणि म्हणूनच त्यांना बोनस शेअर्स म्हणून देखील ओळखले जाते. साधारणता तिमाही निकाल जाहीर करतानाच कंपन्यांकडून बोनस शेअरची घोषणा होत असते. यानुसार, आपले तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर या कंपनीने देखील आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली आहे.