गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! ‘या’ कंपनीकडून 1:3 बोनस शेअर जाहीर, रेकॉर्ड डेट कधी? आज स्टॉक खरेदी केला तर…..

तुम्हीही बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांवर नजर ठेवून असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरतर, शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या RedTape या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केलेली आहे. म्हणून तुम्हाला आज रेड टेप कंपनीच्या स्टॉकवर नजर ठेवावी लागणार आहे.

Tejas B Shelar
Published:

Bonus Share : भारतीय शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या काही दिवसांमध्ये शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांनी आपले तिमाही निकाल जाहीर केलेत. तसेच काही कंपन्यांकडून बोनस शेअर देण्याची सुद्धा मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे.

दरम्यान जर तुम्हीही बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांवर नजर ठेवून असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरतर, शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या RedTape या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केलेली आहे.

म्हणून तुम्हाला आज रेड टेप कंपनीच्या स्टॉकवर नजर ठेवावी लागणार आहे. कंपनी आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी एक्स बोनस स्टॉकच्या आधारावर ट्रेड करत आहे. दरम्यान आज आपण कंपनीच्या बोनस शेअर संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कंपनीने बोनस शेअर साठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे, अशा परिस्थितीत आज आपण बोनस शेअरसाठीची रेकॉर्ड नेमकी काय आहे, आज गुंतवणूकदारांनी या कंपनीचा स्टॉक खरेदी केला तर त्यांना बोनस शेअर चा लाभ मिळणार का? याच मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत.

रेडटेप लिमिटेड कंपनीसाठीची रेकॉर्ड डेट !

रेडटेप लिमिटेडने प्रत्येक 1 शेअरमागे 3 शेअर्स बोनस म्हणून देण्याची घोषणा केली होती. कंपनीने म्हटले होते की पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 3 शेअर्सचा नफा मिळेल. Redtape Limited ने बोनस जारी करण्यासाठी 3 फेब्रुवारी 2025 म्हणजेच आजची रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती.

आम्ही तुम्हाला सांगतो की, रेकॉर्ड डेट ही ती तारीख असते जेव्हा कंपनी तिचे रेकॉर्ड बुक शोधते. ज्यांचे नाव रेकॉर्ड बुकमध्ये असेल अशा गुंतवणूकदारांनाच प्रत्येक 1 शेअरमागे 3 मोफत शेअर्स मिळतील.

आज स्टॉक खरेदी केले तर लाभ मिळणार का ?

आज भारतीय शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांनी जर हा स्टॉक खरेदी केला तर त्यांना लाभ मिळणार का हा प्रश्न उपस्थित होत होता. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आज हा स्टॉक खरेदी केला तर गुंतवणूकदारांना याचा लाभ मिळणार नाही.

जर तुम्ही आज RedTape शेअर्स खरेदी केले तर तुम्हाला बोनस शेअर्सचा कोणताही लाभ मिळणार नाही. कारण रेकॉर्ड डेटच्या एक दिवस आधी शेअर्स खरेदी केले तेव्हाचं बोनस शेअर्सचा फायदा मिळतो. म्हणजे ज्यांनी कालपर्यंत हा स्टॉक खरेदी केला असेल त्यांना याचा लाभ मिळणार आहे.

शेअर बाजारात स्टॉकची परिस्थिती कशी आहे?

शनिवारी अर्थसंकल्पाच्या दिवशी कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे 8 टक्क्यांच्या वाढीसह 728.75 रुपयांवर बंद झाली. पण शनिवारच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही गेल्या 3 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 24 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

मात्र त्याच वेळी, Redtape Limited ने 6 महिन्यांत स्थितीगत गुंतवणूकदारांना 1.82 टक्के परतावा दिला आहे. या शेअरची किंमत 1 वर्षात 11.61 टक्क्यांनी वाढली आहे. या स्टॉकचा 52 आठवड्याचा उच्चांक 981.80 इतका असून 52 आठवड्याचा निचाँक 537.05 इतका आहे. या कोटीचे मार्केट कॅपिटल हे दहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe